मुंबई – बॉलीवूड मधील कलाकारांचे अनेक फॅन्स तथा चाहते असतात. या आवडत्या कलाकारांसाठी हे चाहते अनेक वेळा काहीही करण्यास तयार होतात. काही जण आपल्या हातावर आपल्या लाडक्या कलाकाराचे नाव सुद्धा टॅटू गोंदवून घेतात. दक्षिण भारतात तर चित्रपट सृष्टीविषयी नागरिकांना प्रचंड प्रेम आणि आकर्षण आहे. सहाजिकच तेथे सिनेमातील कलाकारांच्या चाहत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
दक्षिण (साऊथ) सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध स्टार आणि बाहुबली फेम अभिनेता प्रभासच्या फॅन फॉलोइंगबद्दल सर्वांनाच माहिती आहे. वास्तविक विमानतळावर आणि अनेक कार्यक्रमांमध्ये प्रभासला अनेकवेळा चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसला आहे. मात्र सध्या तो त्याच्या आगामी राधेश्याम या चित्रपटांमध्ये खूपच व्यग्र आहे. त्यामुळे प्रभास सोशल मीडियावर फारसा सक्रिय नसला तरी त्याच्या चाहते खास मार्ग शोधतात. अलीकडे प्रभास एका कारणांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. कारण प्रभासने त्याच्या एका चाहत्याला एक मोठे गिफ्ट दिले आहे.
अलीकडेच प्रभासचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यामध्ये प्रभास त्याच्या एका चाहत्यासोबत पोज देताना दिसत आहे. हा व्यक्ती प्रभासचा एवढा मोठा चाहता आहे. कारण त्याच्या डोक्यावर या अभिनेत्याचे म्हणजे प्रभासचे नाव लिहिले आहे. आपल्या चाहत्याच्या या कृतीने प्रभास देखील भावूक झाला. प्रभासने या चाहत्याला त्याच्या घरी बोलावले आणि त्याच्याशी संवाद साधला. तसेच त्याने या खास चाहत्याला एक आलिशान घड्याळ भेट दिले आहे. मात्र, या घड्याळाशी संबंधित जास्त माहिती समोर आलेली नाही.