इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बाबा रामदेव यांच्या कंपनीने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना उत्कृष्ट परतावा दिला आहे. पतंजली फूड्सच्या शेअरच्या किमतीत आजही मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. NSE वर कंपनीच्या समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक १३१८.९५ रुपये गाठला. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या दोन वर्षांत पतंजली फूड्सच्या शेअर्समध्ये १०५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बाबा रामदेव यांच्या या कंपनीच्या कामगिरीबद्दल तज्ज्ञांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.
तज्ज्ञांच्या मते कंपनी आणखी चांगली कामगिरी करत राहील. यामुळेच या स्टॉकचा मागोवा घेणाऱ्या तज्ज्ञांनी त्याला ‘बाय’ टॅग दिला आहे. गेल्या काही दिवसात कंपनीच्या शेअर्सच्या किमती १८ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. NSE वर रु. ११४ वरून उडी मारून, कंपनीच्या शेअरची किंमत ५ ट्रेडिंग सत्रात रु. १३१८.९५ वर पोहोचली. गेल्या आठवड्यात, पतंजली फूड्सने अरुणाचल प्रदेशातील ९ जिल्ह्यांमध्ये ३८ हजार हेक्टर जमिनीवर पाम तेल लागवडीची पायाभरणी केली. कंपनी भारतातील ११ राज्यांतील ५५ जिल्ह्यांमध्ये पाम तेलाची लागवड करत आहे. अरुणाचल प्रदेश व्यतिरिक्त गुजरात, छत्तीसगड, आसाम, मिझोराम, त्रिपुरा या राज्यांचा या यादीत समावेश आहे. पतंजली फूड्स ही पाम तेलाची लागवड करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
पाच वर्षांपूर्वी कंपनीच्या या शेअरची किंमत २६ रूपये होती. आज या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. काही रिसर्च फर्मदेखील खरेदीचा सल्ला देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पतंजली फुड्सच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून येत आहे.
आता काल सोमवारीदेखील कंपनीच्या शेअरमधील वाढीचं सत्र कायम होतं. कामकाजादरम्यान, कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट लागलं. कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांची वाढ होऊन ते १३१८.९५ रूपयांवर पोहोचले आहेत.
गेल्या दोन वर्षांत कंपनीच्या शेअर्सने १०५ टक्के रिटर्न दिले आहेत. तर दुसरीकडे शेअर्सच्या गेल्या पाच वर्षांच्या वाढीकडे पाहिलं तर कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना ५४०० टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. एवढेच नाही तर ज्या गुंतवणूकदारांनी या वर्षी कंपनीच्या एफपीओमध्ये पैसे गुंतवले असतील, त्यांची गुंतवणूक आता दुप्पट झाली असेल.
(महत्त्वाची सूचना – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे हे अत्यंत जोखमीचे आहे. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच योग्य तो निर्णय घ्यावा)
Baba Ramdev Company Share Market Return Investment
BSE NSE Stock Exchange