नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महागाईने नागरिकांना हतबल केले असतानाच आता वाहनांच्या किंमतींमध्येही वाढ होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सहा एअरबॅग्ज आणि स्टार रेटिंगमुळे कारच्या किंमती वाढणार आहे. यामुळे आता कारची मागणी घटणार की काय अशी चिंता वाहन उद्योगापुढे निर्माण झाली आहे.
कारमधील सहा एअरबॅग्जचा मुद्दा बऱ्याच दिवसांपासून गाजतो आहे. हा मुद्दा निकाल निघालेला नाही. अशातच आता ऑटो क्षेत्रावर सरकारने आणखी एक बंधन लादले आहे. वीज उपकरणांबरोबरच आता कारलासुद्धा स्टार रेटिंग दिले जाणार आहे. म्हणजेच स्टार रेटिंग असणारी वाहने आता बाजारात येणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांनी याबाबत मसुदा जारी केला आहे. या रेटिंगचा परिणाम कारसुरक्षेवर होणार आहे. या नवीन टेस्टिंग प्रोटोकॉलला भारत NCAP म्हणजेच भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम असे नाव देण्यात आले आहे.
आधीच अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असलेल्या ऑटो क्षेत्रापुढे आता रेटिंगचे आणखी एक आव्हान उभे राहिले आहे. कारण किंमती वाढल्याने ग्राहकांचा प्रतिसाद खालावेल की काय अशी भीती कंपन्यांमध्ये निर्माण झाली आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून प्रत्येक कारमध्ये सहा एअरबॅग्ज अनिवार्य करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या कारणाने हे बदल महत्त्वाचे ठरणार आहेत. पण यामुळे कमी किंमतीच्या वाहनांच्या किंमतींमध्येही मोठी वाढ होणार आहे. ऑटो क्षेत्राचे लक्ष प्रामुख्याने युटिलिटी वाहनं आणि प्रीमियम कारच्या विक्रीवर अवलंबून आहे. पण इथेही परिस्थिती जिकिरिची असल्याने ऑटो क्षेत्रापुढे आव्हान उभे राहिले आहे.
चारचाकी वाहनांसाठी वेटिंग पिरियडदेखील मोठा आहे. महिंद्रा XYV700 या गाडीसाठी तब्बल एक वर्षाचा वेटिंग पिरियड आहे. सेमीकंडक्टरचा तुटवडा असल्याचे कारण यामागे सांगितले जाते. अशातच टाटा मोटर्सने एक जुलैपासून कमर्शियल वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. या सगळ्यामुळे ग्राहकांचीही निराशा होत आहे.
Automobile Car Prices will hike soon due to this reason