इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – वाहन निर्मिती क्षेत्रातील कंपनी असलेल्या होंडाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील दोन कारचे मॉडेल बंद करण्याचे कंपनीने घोषित केले आहे. कंपनीने यापूर्वीच CR-V, BR-V आणि Mobilio सारखी मॉडेल्स बंद केली आहेत. आता कंपनीचे Jazz आणि WR-V हे दोन कार मॉडेल्स पुढील वर्षापासून बंद होणार आहेत.
पेट्रोल प्रकारातील होंडा WRV या कारची किंमत ९ लाख रुपये, VX MT मॉडेलची ९ लाख ८९ हजार रुपये आहे. तर, डिझेल कारची किंमत ११ लाख रुपये आहे. आणि VX MT ची किंमत १२ लाख रुपये आहे. या सर्व किंमती एक्स शोरूम आहेत. तर, Jazz मॉडेलची किंमत ८ लाख पासून सुरू होते. सर्वात कमी किंमतीचे मॉडेल Jazz V आहे. Jazz ZX CVT चे सर्वात किमतीचे मॉडेल १० लाख रुपये किंमतीचे आहे.
WR-V या मॉडेलच्या ऑगस्ट महिन्यात फक्त ४१५ कार विक्री झाल्या. याच मॉडेलच्या ५२७ कार विक्री झाल्या होत्या. त्यामुळे महिन्याभरातच तब्बल ३८ टक्क्यांची घट झाली. तर, Jazz या मॉडेलच्या ऑगस्ट महिन्यात केवळ ४४८ कार विक्री झाल्या. ही वाहने बंद करण्यासोबतच पुढील वर्षी नवीन वाहने बाजारात आणण्याचीही कंपनीची योजना आहे. होंडासाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत कंपनीने आपली विक्री वाढवण्यासाठी पुन्हा एसयूव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. होंडा पुढील वर्षी आपले SUV मॉडेल भारतात आणण्याच्या योजनांवर काम करत आहे.
Automobile Car Company Announce 2 Model Sale will be Closed
Hona Jazz Honda WRV