इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आपल्याकडे ज्योतिषशास्त्राला मोठे महत्त्व आहे. ग्रह, तारे यांच्या हालचालींवरुन राशींवर मोठा परिणाम होतो. सहाजिकच त्या त्या राशींच्या व्यक्तींना त्याचा अनुभव येतो. हे एक मोठे शास्त्र आहे ज्याला पूर्वापार मोठी परंपरा आहे. वरुण (नेपच्यून) हा ग्रह पृथ्वीपासून खूप दूर अंतरावर आहे. या ग्रहामध्ये तब्बल १४ वर्षांनी मोठा बदल झाला आहे. वरुणने त्याची राशी गेल्या ११ सप्टेंबर रोजी बदलली आहे. वरुण या ग्रहाने कुंभ राशीत प्रवेश केला आहे. वरुण ग्रहाला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी १४ वर्षे लागतात, असे सांगितले जाते. वरुण ग्रहाच्या कुंभ राशीतील प्रवेशाचा अन्य राशींवर मोठा परिणाम झाला आहे. तो का आहे हे आपण आता जाणून घेऊ..
कर्क
या राशीच्या लोकांना या काळात भौतिक सुख मिळेल. नोकरीत स्थिती मजबूत राहील. व्यवसायातही तुम्हाला चांगला फायदा होईल. दुसरीकडे, जर तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर हे स्वप्न लवकरच होऊ शकते. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.
मकर
या राशीच्या लोकांसाठी नेपच्यूनचे संक्रमण विशेष फलदायी ठरेल. कल्पनाशक्ती आणि सर्जनशीलता वाढेल. एवढेच नाही तर या संक्रमणामुळे तुमच्या लोकप्रियता वाढ होईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. या काळात प्रवासाचे योग तयार होत आहेत. मान-सन्मान मिळेल.
वृषभ
या राशीच्या लोकांसाठी हा काळ सुवर्णकाळ आहे. वरुण ग्रहाच्या कुंभ राशीतील संक्रमणामुळे वृषभ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. या दरम्यान, तुम्ही काही नवीन लोकांना भेटू शकता, जे भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. त्याचबरोबर कला क्षेत्राशी निगडित लोकांसाठीही हा काळ अतिशय अनुकूल आहे. या लोकांना या काळात भरपूर यश मिळेल.
कुंभ
या राशीच्या लोकांसाठीदेखील हे संक्रमण खूप खास असणार आहे. या काळात त्यांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. तुम्ही या काळात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ते करू निश्चित शकता. इतकंच नाही तर तुम्ही नोकरीसोबत व्यवसायही सुरू करू शकतात.
कन्या
या काळात कन्या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात विशेष वाढ होईल. या काळात तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवण्याची भरपूर संधी मिळेल. कला क्षेत्राशी संबंधित लोकांनाही विशेष लाभ होईल. या काळात तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. नवीन नोकरीचा शोध लवकरच पूर्ण होऊ शकतो.
Astrology Varun Grah Kumbha Rashi Pravesh Parinam