मुंबई – आरोग्य तथा वैद्यकीय उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी तथा उच्चशिक्षित डॉक्टरांसाठी प्राध्यापक होण्याची संधी आहे. कारण मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाशी सलंग्न असलेल्या मेडिकल कॉलेजमध्ये कंत्राटी तत्त्वावर सहायक प्राध्यापक पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.
सहायक प्राध्यापक पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करू शकतात. उमेदवारांना दि.१० डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या टी. एन. मेडिकल कॉलेजमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या ११३ जागांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहेत. निवड झालेल्या सर्व उमेदवारांना कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती दिली जाईल, असे मुंबई महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून कळवण्यात आले आहे.
सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे एमडी. एमएस, डीएनबी, एम.सीच, एएससी पदवी असणं आवश्यक आहे. यशिवाय सरकारी आणि खासगी संस्थेतील अनुभव असणे आवश्यक आहे. या पदांसाठी निवड झालेल्या उमदेवारांना सुमारे ८० हजार ते १ लाख रुपये मानधन दिले जाणार आहे. टी.एन. मेडिकल कॉलेजमीधल सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना डिस्पॅच विभाग, टी.एन. मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलचा तळमजला, मुंबई येथे अर्ज उपलब्ध होतील.
ईच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचा असून संबंधित शैक्षणिक कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. मुंबई महापालिकेने सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या सदर उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर महापालिकेकडून मुलाखती घेण्यात येणार आहे. मात्र मुलाखतीची तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे.