दिंडोरी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाव उत्सवामुळे सर्व समाज एकत्र येत धार्मिक सामाजिक सलोखा राखला जातो. बोहाडा व इतर पारंपरिक उत्सवाची परंपरा कायम ठेवत संस्कृती जपली जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील बोपेगावं येथे बोहाडा उत्सवास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी भेट दिली. उत्सवात पांडव मुखवटा धारण करत त्यांनी सदर उत्सवात सहभाग घेतला. त्यांनी मुखवट्याची मिरवणूक काढत संभळाच्या तालावर ठेका धरला. यावेळी ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे)
https://youtube.com/shorts/nWnWOAKXBMw?feature=share
झिरवाळ यांच्या बोहड्यातील सक्रिय सहभागाने गावकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. युवकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत नाचत आनंद साजरा केला. सरपंच वसंत कावळे यांनी झिरवाळ यांचे स्वागत केले. बोहाड्याची माहिती वसंतराव रुंजा कावळे यांनी दिली. बोहाडा उत्सवात विविध धार्मिक देखाव्यांच्या वाजत गाजत मिरवणूक होत संस्कृती जपली जात आहे.
यावेळी कादवा चे संचालक सुकदेव जाधव,बाजार समिती उपसभापती अनिल देशमुख, जिप सदस्य आत्माराम कुंभार्डे,राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष शाम हिरे,रघुनाथ गायकवाड,डॉ.अनिल सातपुते,शरद महाले आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
(व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे)
https://youtube.com/shorts/mCr-PQURUMg?feature=share