इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काही दिवसापूर्वी वादग्रस्त ज्ञानव्यापी प्रकरणानंतर देशभरातील अनेक प्रार्थना स्थळे तथा मस्जिदमध्ये हिंदू देवदेवतांच्या मुर्ती तथा मंदिरे जमिनीखाली गाडल्याचे असल्याचा युक्तिवादता आरोप अनेक जहालवादी हिंदू संघटनांनी केला होता, मात्र त्यानंतर कालांतराने या वादावर पडदा पडला, मात्र हे प्रकरण थंडावले असतानाच पुन्हा एकदा ताजमहल मध्ये हिंदू देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला. मात्र तेथे असे काहीही आढळून आले नसल्याचे संबंधित खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ताजमहालात शिवमंदिर असून तळघरात अनेक दशकांपासून बंद असलेल्या २२ खोल्यांमध्ये हिंदू देव देवतांच्या मूर्ती असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र, ताजमहालात कोणत्याही बंद खोल्या नाहीत. तसेच ताजमहालच्या जागी मंदिर नव्हते. ताजमहाल मध्ये कुठेही देव देवतांची मूर्ती नाही असा खुलासा भारतीय पुरातत्व खात्याने केला आहे. एका आरटीआयला उत्तर देताना पुरातत्व खात्याने हे स्पष्टीकरण दिले आहे.
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या, ताजमहालात अनेक दशकांपासून बंद असलेल्या 20 खोल्यांमध्ये खरचे हिंदू देव देवतांच्या मूर्ती आहेत का? याबाबतचे रहस्य अखेर उलगडले आहे. भारतीय पुरातत्व खात्याने याबाबत खुलासा केल्याने याचिका कर्त्यांसाठी हा मोठा झटका मानला जात आहे. या संदर्भात अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठात एक याचिका दाखल करण्यात आली होती. यात ताजमहालात बंद असलेल्या २२ खोल्या उडून तपास करावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. भाजपाच्या अयोध्या जिल्ह्याचे माध्यम प्रभारी डॉ. रजनीश सिंह यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली होती.
विशेष म्हणजे ताजमहाल हा तेजो महाल असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला होता. याप्रकरणी सत्य संशोधन समिती गठित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ताजमहाल परिसराचे सर्वेक्षण करण्याची गरजही व्यक्त करण्यात आली होती. यानिमित्ताने ताज महालात शिवमंदिर आहे का कीहा ताजमहालच आहे, याचीही स्पष्टता येईल, असा दावाही करण्यात आला होता.
सत्य संशोधन समितीमार्फत बंद असलेल्या ताजमहालातील २२ खोल्यांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी हिंदू मूर्ती, शिलालेख वा धर्मग्रथांतील काही पुरावे आहेत का, हेही यानिमित्ताने स्पष्ट होईल, अशी याचिकाकर्त्यांनी मागणी केली होती . पुरातत्व विभागाने यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, अशा प्रकारच्या खोल्याच नसल्याचा दावा पुरातत्व विभागाने केला आहे.
ताजमहालाच्या चार मजली बांधकामात वरती आणि खालच्या बाजूला २२ खोल्या आहेत, ज्या वर्षानुवर्षे बंद आहेत. या प्रकरणाबाबत अयोध्येतील संत परमहंसांनी ताजमहालच्या आत पूजा करण्याचा प्रयत्न केला होता, त्यानंतर भाजप नेत्यांनी आता न्यायालयाला ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची विनंती केली आहे. अयोध्या भाजपचे मीडिया प्रभारी डॉ.रजनीश सिंह यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी रजनीश सिंह यांनी राज्य सरकारकडे समिती स्थापन करून बंद खोल्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासोबतच हिंदू मूर्ती आणि धार्मिक ग्रंथांशी संबंधित तथ्यांची चौकशी करण्याचेही सांगण्यात आले आहे. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालचा वाद नवा नाही. मुघल राजवटीत हिंदू धार्मिक स्थळे लक्ष्य करण्यासाठी एक आधार असल्याचे मानले जाते. काही इतिहासकार ताजमहालचे वर्णन मुघल काळातील सर्वोत्तम वास्तुकला म्हणून करतात. त्यामुळे ताजमहालच्या आजूबाजूला हिंदू वास्तू असू शकतात, असेही काही इतिहासकार सांगतात.
Archeological Department Taj Mahal 22 rooms Hindu Idols what is current status