India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अक्षरबंधच्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा; महाडिकसह यांना मिळाला पुरस्कार

India Darpan by India Darpan
July 29, 2022
in साहित्य व संस्कृती
0
लेखक - प्रा.लक्ष्मण महाडिक

लेखक - प्रा.लक्ष्मण महाडिक


लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले,
प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांना जाहीर
नाशिक ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अक्षरबंध फाउंडेशनतर्फे आयोजित राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यात लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, राजेंद्र उगले, डॉ. स्मिता दातार, वीणा रारावीकर, डॉ. राजेंद्र राऊत, प्रसाद खापरे यांच्या साहित्यकृतींची निवड करण्यात आली. तसेच सटाणा येथील ज्येष्ठ साहित्यिक शंकर कापडणीस यांना त्यांच्या साहित्यसेवेची दखल घेऊन ‘अक्षरबंध जीवनगौरव’ पुरस्काराने तर ‘अक्षरबंध साहित्यरत्न’ पुरस्काराने निशा डांगे (पुसद) यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा गौरव करण्याच्या उद्देशाने अक्षरबंध परिवाराने या वर्षापासून राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कार सुरू केले आहे. या पुरस्कारांसाठी सर्व साहित्य प्रकारांत एकूण ३४५ साहित्यकृतींचे प्रस्ताव आले होते. त्यातून परीक्षकांनी या साहित्यकृतींची निवड केली. पुरस्कारांचे लवकरच नाशिक येथे एका कार्यक्रमात वितरण करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रवीण जोंधळे, उपाध्यक्ष सप्तर्षी माळी, सचिव साई बागडे, खजिनदार किशोरी बावके, सदस्य कल्याणी देशपांडे, डॉ. गणेश मोगल, योगेश विधाते यांनी दिली.
– सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह- स्त्री कुसाच्या कविता- लक्ष्मण महाडिक (पिंपळगाव, जि.नाशिक)
– सर्वोत्कृष्ट कथासंग्रह – दमकोंडी- ज्योती सोनवणे (औरंगाबाद)
– सर्वोत्कृष्ट कादंबरी- टिश्‍यू पेपर- रमेश रावळकर (औरंगाबाद)
– सर्वोत्कृष्ट बालसाहित्य (कविता)- थांब ना रे ढगोबा – राजेंद्र उगले (नाशिक)
– सर्वोत्कृष्ट चरित्र- प्रभु आजि गमला- डॉ.स्मिता दातार (मुंबई)
– सर्वोत्कृष्ट ललित-आकाशवीणा- वीणा रारावीकर (मुंबई)
– सर्वोत्कृष्ट समीक्षा-लीळाचरित्रातील कथनरुपे- डॉ. राजेंद्र राऊत (अमरावती )
– सर्वोत्कृष्ट मराठी अनुवाद-इकिगाई- प्रसाद खापरे (मुंबई)
– अक्षरबंध जीवनगौरव – शंकर कापडणीस (सटाणा)
– अक्षरबंध साहित्यरत्न पुरस्कार – निशा डांगे-नायगावकर (पुसद)

पुरस्काराचे स्वरूप रोख तीन हजार, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे असून अक्षरबंध परिवारातील शं. क. कापडणीस, सटाणा, सरोजिनी देवरे, मुंबई, डी. के. चौधरी, तळेगाव, दीपाली महाजन, पुणे, दीपाली मोगल-बोंबले, नाशिक, कपिल भालके, ओझर, सुयश कॉम्प्युटर, ओझर, दशरथ ढोकणे, शेवगेदारणा यांनी दहा वर्षासाठी पुरस्कार पुरस्कृत केले आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिकाला ‘अक्षरबंध जीवनगौरव सन्मान’ पुरस्कार देण्यात येणार असून रोख पाच हजार, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून आबा शिंदे, ओझर यांनी पुरस्कृत केला आहे. सर्व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांचे अक्षरबंध परिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


Previous Post

शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, तातडीने मदत जाहीर करा; अजित पवार

Next Post

नाशिकमध्ये शरद पवार यांनी शिंदे सरकार केली ही टीका

Next Post

नाशिकमध्ये शरद पवार यांनी शिंदे सरकार केली ही टीका

ताज्या बातम्या

अदानी समुहावरील आरोपांचे संसदेत पडसाद; भारतीयांचे पैसे धोक्यात असल्याचे सांगत विरोधकांनी केली ही मागणी

February 2, 2023

अदानी समुहाच्या वादात आता RBIची एण्ट्री; बँकांकडून मागविली ही माहिती

February 2, 2023

‘उपराष्ट्रपती धनखड आणि कायदामंत्री रिजिजूंंना अपात्र ठरवा’, वकीलांच्या संघटनेची हायकोर्टात धाव

February 2, 2023

अर्थसंकल्प नेमका कसा आहे? मंत्री रामदास आठवलेंचा व्हिडिओ तुफान व्हायरल; तुम्हीही बघा…

February 2, 2023

नाशिक ग्रामीणचे युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे अपघाती निधन

February 2, 2023

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणीस सुरु, कुणाचे पारडे जड? सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील?

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group