India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सावधान! पुढील काही दिवसांसाठी असा आहे हवामान विभागाचा पावसाचा अंदाज

India Darpan by India Darpan
September 27, 2022
in महत्त्वाच्या बातम्या
0

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या दोन वर्षांपासून नवरात्रोत्सवावर कोरोना महामारीचे सावट होते. यंदा कोरोनाचे संकट नसल्याने नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली आहे. पण या तयारीत यंदा पावसाचे विघ्न आले आहे. हवामान विभागातील तज्ज्ञांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या चार दिवसात पावसाची शक्यता आहे. त्यामुळे ऐन पावसात गरबा खेळावा लागण्याची चिंता अनेकांना सतावू लागली आहे.

राज्यात पावसासाठी पुन्हा हवामान पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, राज्यात उन्हाची स्थितीदेखील पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याची नोंद करण्यात आली होती.

परतीचा प्रवास थांबला
राज्याच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आजपासून पुढचे चार दिवस पावसाची शक्यता आहे. काही भागात तुरळक तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. याबरोबरच, महाराष्ट्राच्या उर्वरीत काही ठिकाणीही पावसाची नोंद झाली आहे. सध्या मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला आहे. उत्तर पंजाब आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. बिहारपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. आंध्र प्रदेश आणि परिसरावर देखील चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम असल्याची माहिती हवामान विभागाने दिलाय.

काही जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस
चक्राकार वाऱ्यांच्या स्थितीमुळे सध्या राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजपासून पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचप्रमाणे धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Alert IMD Climate Heavy Rainfall Forecast
Weather Maharashtra


Previous Post

देवी सरस्वतीवरुन छगन भुजबळांचे वादग्रस्त वक्तव्य; ब्राह्मण महासंघाचा तीव्र आक्षेप

Next Post

मिरचीपुड टाकत दुचाकीस्वारांनी सराफाच्या व्यवस्थापकास लुटण्याचा केला प्रयत्न

Next Post

मिरचीपुड टाकत दुचाकीस्वारांनी सराफाच्या व्यवस्थापकास लुटण्याचा केला प्रयत्न

ताज्या बातम्या

Good News! डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आता या सरकारी योजनेचा लाभ

February 1, 2023

फलटण-पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्गासाठी राज्य सरकार देणार ९२१ कोटी रुपये

February 1, 2023
संग्रहित छायाचित्र

आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गाबाबत झाले हे महत्त्वाचे निर्णय; पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

February 1, 2023
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

बाल संगोपन परिपोषण अनुदानात भरीव वाढ; राज्यातील ५४ हजार लाभार्थ्यांना मिळणार एवढे पैसे

February 1, 2023

कोकणातील आंगणेवाडी यात्रेला जाणाऱ्यांना मोठा दिलासा; यंदा मिळणार या सर्व सुविधा

February 1, 2023

गाईसाठी ७० हजार रुपये… म्हशीसाठी ८० हजार रुपये… राज्य सरकारने केली खरेदी किंमतीत वाढ 

February 1, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group