India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

सोशल मिडियात आक्षेपार्ह पोस्ट… अकोल्यात दोन गटात दंगल… गिरीश महाजनांकडून पाहणी

India Darpan by India Darpan
May 15, 2023
in राज्य
0

अकोला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याच्या मुद्द्यावरून जुने शहरात दोन गटात झालेल्या वादातून झालेल्या दंगलग्रस्त भागाची पाहणी आज राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी केली. या घटनेत मयत व्यक्तीच्या परिवाराची भेट घेऊन सांत्वन केले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या घटनेच्या पाहणी दरम्यान श्री. महाजन बोलत होते. यावेळी विधानपरिषद सदस्य आमदार वसंत खंडेलवाल, विधानसभा सदस्य आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाधिकारी निमा अरोरा, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, तहसिलदार सुनिल पाटील आदि उपस्थित होते.

श्री. महाजन यांनी जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किल्ला चौक, हरिहर पेठ, हमजा व सोनटक्के प्लॉट या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. बाधित परिवारास आर्थिक मदतीसह सर्व सहकार्य करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. तत्पूर्वी जुने शहर पोलिस स्टेशन येथे दंगल परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवावी. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेने कडक कारवाई करावी, असेही निर्देशही श्री. महाजन यांनी दिले.

Akola Riot Social Media Post Girish Mahajan Visit


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य… अवघ्या २४ तासात मंजुरी

Next Post

सफाई कामगारांच्या वारसांना ५० लाखांचे अर्थसहाय्य... अवघ्या २४ तासात मंजुरी

ताज्या बातम्या

या व्यक्तींनी आज वादाचे प्रसंग टाळावेत; जाणून घ्या, गुरुवार, १ जून २०२३चे राशिभविष्य

May 31, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – गुरुवार – १ जून २०२३

May 31, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – नवरा-बायको

May 31, 2023

निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

May 31, 2023

नाफेडच्या उन्हाळ कांदा खरेदीचा शुभारंभ… इतके मेट्रिक टन खरेदी करणार… डॉ. भारती पवार यांच्या प्रयत्नांना यश

May 31, 2023

अंबड औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना फायर सेसबाबत मोठा दिलासा; झाला हा मोठा निर्णय

May 31, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group