इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाला मोठा दणका बसला आहे. कोविड १९ महामारी दरम्यान फ्लाइट रद्द केल्यामुळे किंवा त्यांच्या वेळापत्रकात बदल झाल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत करण्यासाठी एअर इंडियाला १.४ दशलक्ष डॉलर (११.३८ कोटी रुपये) शुल्क आकारले आहे. अमेरिकन सरकारने हा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेचे नियम काय सांगतात?
यूएस परिवहन विभागाने सांगितले की, एअर इंडिया सहा एअरलाइन्सपैकी एक आहे ज्यांना परतावा म्हणून प्रवाशांना एकूण ६०० दशलक्ष डॉलर परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एअर इंडियाला १२१.५ दशलक्ष डॉलर (९८८ कोटी रुपये) परत करण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एअर इंडियाने विनंती केल्यावर प्रवाशांना परतावा देण्याची तरतूद यूएस परिवहन विभागाच्या धोरणांच्या विरोधात आहे. एखादे विमान रद्द किंवा बदलल्यास विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या तिकिटाचे पैसे कायदेशीररीत्या परत करावेत, असा नियम अमेरिकन सरकारने केला आहे.
विभागीय चौकशीत असे आढळून आले की, एअर इंडियाला अर्ध्याहून अधिक रिफंड अर्जांवर प्रक्रिया करण्यासाठी १०० दिवसांपेक्षा जास्त वेळ लागला. परताव्याच्या विलंबाची ही प्रकरणे टाटा समूहाने एअर इंडियाच्या अधिग्रहणापूर्वीची आहेत. एअर इंडियाशिवाय फ्रंटियर, TAP पोर्तुगाल, एरो मेक्सिको, EI AI आणि Avianca Airlines यांनाही अमेरिकन सरकारने दंड ठोठावला आहे.
Air India 988 Crore Fine Penalty Air Service
USA