अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील 90 हजार 113 लाभार्थ्याची बँक खाती आधार संलग्न करणे प्रलंबित आहेत. केंद्र शासनाकडून योजनेचा 13 वा हप्ता वितरणापूर्वी लाभार्थीची बँक खाती आधार संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आधार संलग्न केलेल्याच बँक खात्यांमध्ये यापुढील लाभ वितरीत केला जाणार आहे. म्हणजेच, आधारला बँक खाते न जोडणाऱ्या 90 हजार 113 शेतकऱ्यांना पीएम किसान निधीचे दर महा २ हजार रुपये मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे.
पीएम किसान योजनेच्या लाभार्थीस व्यक्तीश: संबंधित बँकेत जाऊन स्वतःचे बँक खाते आधार संलग्न करून घेणे आवश्यक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ सुरु ठेवण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
Ahmednagar 90 Thousand Farmers PM Kisan Scheme
Aadhar Card Bank Account