मनीष कुलकर्णी, मुंबई
व्हॉट्सअॅप या इंस्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर व्हॉईस मेसेज सर्वाधिक लोकप्रिय फिचर आहे. आता व्हॉट्सअॅपने व्हॉईस मेसेजसाठी नव्या फिचरची घोषणा केली आहे. या फिचरमुळे व्हॉईस मेसेज पाठविण्यापूर्वी युजर्स ते ऐकू शकतील. संबंधित व्हॉईस मेसेजमध्ये जर तुम्ही काहीतरी चुकीचे बोलला असाल, तर तो मेसेज तुम्ही डिलीट करू शकणार आहात. शेअर करण्यासाठी व्हॉईस मेसेज पुन्हा रेकॉर्ड करू शकणार आहात.
व्हॉट्सअॅपवर व्हॉईस मेसेज प्रीव्ह्यू फिचर खासगी आणि ग्रुप चॅट दोन्हींसोबत काम करणार आहे. तसेच अँड्रॉइड, आयओएस, वेब आणि डेस्कटॉपसह सर्व प्लॅटफॉर्मसाठी जारी करण्यात आले आहे. आपल्या फोनमध्ये हे फिचर कसे काम करेल हे जाणून घेऊया.
नवे फिचर कसे काम करेल
१) एका व्यक्तीची चॅट विंडो उघडा.
२) हँड्स-फ्री रेकॉर्डिंग लॉक करण्यासाठी मायक्रोफोनवर स्पर्श करा आणि त्याला वरच्या दिशेने स्लाइड करा.
३) रेकॉर्डिंगसाठी बोलायला सुरुवात करा.
४) बोलणे झाले असेल तर स्टॉपवर टॅप करा.
५) आपले रेकॉर्डिंग ऐकण्यासाठी प्ले वर टॅप करा. रेकॉर्डिंगमधील कोणताही भाग ऐकण्यासाठी कोणत्याही भागावर टाइमस्टँपने चालविण्यासाठी टॅप करू शकता.
६) व्हॉईस मेसेज डिलिट करण्यासाठी ट्रॅश कॅन वर टॅप करा. तो मेसेज पाठविण्यासाठी सेंडवर टॅप करा.
व्हॉईस मेसेजचा वेग कसा वाढवावा
१) तुम्ही पाठविलेला किंवा आलेला व्हॉईस मेसेज ऐकण्यासाठी प्ले वर क्लिक करा.
२) मेसेज ऐका.
३) जर संदेश सुरू असेल, तर तुम्ही त्याचा वेग 1.5x किंवा 2x पर्यंत वाढविण्यासाठी 1x आयकॉनवर क्लिक करू शकतात.