पुणे – जगभरात अनेक घटना आणि घडामोडी घडत असतात. त्यात काही सातत्याने घडत असतात तर काही दुर्मिळ असतात. येत्या काही दिवसात जगामध्ये अशी एक घटना घडणार आहे जी तब्बल ६०० वर्षांनंतर होणार आहे. त्यामुळे या घटनेकडे संपूर्ण पृथ्वीवासियांचे लक्ष लागले आहे. कारण, त्या घटनेचे अनेक जण साक्षीदार होणार आहेत.
जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. चंद्रग्रहण ही एक पूर्णत: वैज्ञानिक खगोलीय घटना असून चंद्रग्रहण पौर्णिमेला दिसते. या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण दि.१९ नोव्हेंबर रोजी दिसणार आहे.
कार्तिक शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला चंद्रग्रहण होईल. भारतात या चंद्रग्रहणाला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. असा योगायोग ६०० वर्षांनंतर घडत आहे. हे चंद्रग्रहण केवळ भारतातच नाही तर पश्चिम आफ्रिका, पश्चिम युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागराच्या काही भागात दिसणार आहे.
या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण दि. १९ नोव्हेंबरला होणार आहे. यापूर्वी २६ मे रोजी पहिले चंद्रग्रहण झाले होते. भारतात धार्मिक मान्यतांनुसार चंद्रग्रहण असो की सूर्यग्रहण, दोन्ही अत्यंत अशुभ मानले जातात. कारण या काळात पृथ्वीवर नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, ज्याचा या पृथ्वीवरील सर्व सजीवांवर वाईट परिणाम होतो. परंतु त्याच वेळी, वैज्ञानिकांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा चंद्राला प्रकाश मिळत नाही, या खगोलीय क्रियेला चंद्रग्रहण म्हणतात.
कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे शुक्रवारी, वृषभ आणि कृतिक नक्षत्रात चंद्रग्रहण होईल. भारतीय वेळेनुसार १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३४ वाजता ग्रहण सुरू होईल आणि ०५.३३ वाजता संपेल. हे आंशिक चंद्रग्रहण असेल, जे भारत, उत्तर युरोप, अमेरिका, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक महासागराच्या भागात आणि भारतासह आशियातील बहुतांश भागांमध्ये दिसेल. गेल्या ६०० वर्षांनंतर एवढं लांब चंद्रग्रहण होणार आहे.
नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (नासा) नुसार, आंशिक ग्रहण भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी
१२ : ४८ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ४ :१७ वाजता संपेल. या ग्रहणाचा आंशिक टप्पा चंद्रोदयानंतर अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या उत्तर-पूर्व भागात संपेल. शेवटचे असे लांबचे आंशिक चंद्रग्रहण १८ फेब्रुवारी १४४० रोजी झाले होते आणि पुढील ८ फेब्रुवारी २६६९ रोजी दिसणार आहे.