इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अदानी डेटा नेटवर्क्स लिमिटेड (ADNL) ला प्रवेश योग्यता सेवांसाठी युनिफाइड परवाना देण्यात आला आहे. या परवान्याद्वारे कंपनी देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा देऊ शकते. या परवान्यामुळे देशात आणखी एका दिग्गज कंपनीची दूरसंचाक क्षेत्रात एण्ट्री झाली आहे. परिणामी, या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी अदानी जोरदार टक्कर देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या घडामोडीशी परिचित असलेल्या सूत्रांनी अदानी समूहाच्या कंपनी ADNL ला एकात्मिक दूरसंचार परवाना मंजूर झाल्याची माहिती दिली. लांब अंतरावर कॉल करण्यासाठी आणि त्याच्या नेटवर्कवर इंटरनेट सेवा प्रदान करण्यास ADNL ही कंपनी पात्र आहे. हा परवाना मिळाल्यानंतर, कंपनी भविष्यात तिच्या 5G सेवांचा विस्तार करू शकते. अदानींच्या प्रवेशामुळे व्होडाफोन-आयडिया व्यतिरिक्त जिओ, एअरटेल यांसारख्या कंपन्यांसमोर नवीन आव्हान असेल.
या संदर्भात अधिकृत सूत्राने सांगितले की, “अदानी डेटा नेटवर्क्सला UL (AS) परवाना मिळाला आहे.” दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी परवाना जारी करण्यात आला. मात्र, या संदर्भात अदानी समूहाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अदानी समूहाने नुकत्याच झालेल्या लिलावात स्पेक्ट्रम खरेदी करून देशातील दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. या स्पेक्ट्रमचा वापर समूहातील व्यावसायिक उपक्रमांसाठी करणार असल्याचे कंपनीने त्यावेळी सांगितले होते. ADNL ने नुकत्याच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात 400 MHz स्पेक्ट्रम २० वर्षांसाठी २१२ कोटी रुपयांना विकत घेतले होते.
Adani Company Got Telecom License in India