मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बॉलीवूड चित्रपटसृष्टी मध्ये अनेक अभिनेते आणि अभिनेत्री यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे अफेअर आणि प्रेमाच्या ही चर्चा नेहमी रंगतात. गेल्या अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या कलाकारांचे एकमेकांच्या सहवासात एकमेकांवर प्रेम जडते. त्यानंतर ती लग्नही करतात. काहींचे कालांतराने घटस्फोट होतात. परंतु काही अभिनेते आणि अभिनेत्री कायम चर्चेत असतात. यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे रेखा होय.
खरे म्हणजे रेखाचे नाव अनेक दिग्गज कलाकारांबरोबर जोडले गेले होते. विशेषतः अमिताभ बच्चन यांच्यासमवेत रेखाची नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. परंतु वास्तविक जीवनामध्ये रेखा यांनी अभिनेता विनोद मेहरा यांची साथ शेवटपर्यंत सोडली नाही असे म्हटले जाते आणि ते वास्तवात खरे देखील आहे. तसा खुलासा प्रत्यक्ष विनोद मेहरा यांच्या पत्नी किरण मेहरा यांनीच केला आहे. आता या संदर्भात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
प्रसिद्ध अभिनेते विनोद मेहरा या जगात नसतील पण आजही ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. विनोद मेहरा हे ७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेते होते. अभिनयासोबतच अभिनेत्री रेखासोबतच्या नात्यामुळेही ते इंडस्ट्रीत चर्चेत राहिले होते. पुन्हा एकदा रेखा आणि विनोद मेहरा चर्चेत आले आहेत. कारण विनोद मेहरा यांची पत्नी किरण मेहरा हिने विनोद आणि रेखा यांच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.
एका मुलाखती दरम्यान किरण यांनी सांगितले की, रेखा एक अद्भुत व्यक्ती आहे आणि तिने शेवटच्या श्वासापर्यंत विनोदला विश्वासाने साथ दिली. किरण मेहराने दिलेल्या एका मुलाखतीत विनोद मेहरा आणि रेखा यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, रेखाने विनोदला आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ दिली आणि ती एक निस्वार्थ प्रेमळ आणि क्षमाशील स्त्री आहे. रेखा देखील त्यांच्या लग्नाला आली होती आणि आज जर ती मला भेटली तर मी तिला कडकडून मिठी मारेल, असेही किरण म्हणाल्या.