मुंबई – बॉलिवूड सेलिब्रेटी नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहतात. खासकरुन अभिनेत्री. आताही अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा या विशेष चर्चेत आल्या आहेत. निमित्त आहे ते त्यांचे घर सील केल्याचे. वित्तीय थकबाकीमुळे ही कारवाई झालेली नाही तर मुंबई महापिलेकेने वेगळ्याच कारणासाठी त्यांचे घर सील केले आहे.
कोरोनाचा संसर्ग कमी – अधिक प्रमाणात होत असतानाच गेल्या दीड वर्षात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच राजकीय, सामाजिक, क्रीडा, चित्रपट या क्षेत्रातील सेलिब्रिटी तथा मान्यवरांना देखील कोरोनाचा संसर्ग झालेला होता. आता बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. बीएमसीने त्यांचे घर सील केले आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर करीना कपूर खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक स्टेटमेंट जारी केले आहे.
या संदर्भात करीना कपूर हिने स्वतःच्या तब्येतीची माहिती दिली आहे. तसेच इंस्टाग्राम अकाऊंटवर लिहिले की, ‘मी कोविड १९ पॉझेटिव्ह झालेले आहे. सर्व वैद्यकीय प्रोटोकॉलचे पालन करून मी ताबडतोब स्वतःला वेगळे केले. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करते, कृपया तुमची चाचणी करून घ्या. माझे कुटुंब आणि कर्मचारी यांचे देखील दोन्ही लशीकरण करण्यात आले आहेत. त्यापैकी अद्याप कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. आता मला बरे वाटत आहे आणि आशा आहे की मी लवकरच बरा होईल.’
करीना कपूर खानचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे, करिना कपूर खानला कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर बीएमसीने (बृहन्मुंबई महानगरपालिका) तिचे घर सील केले आहे. बीएमसीने एक निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली असून असेही सांगण्यात आले आहे की, अभिनेत्रीने अद्याप त्याला संपूर्ण माहिती योग्यरित्या दिलेली नाही.