रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अभिनेत्री जुही चावलाला उच्च न्यायालयाने फटकारले; कारण…

by India Darpan
जुलै 8, 2021 | 5:33 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
juhi chawla

नवी दिल्ली – सदाबहार भूमिका करून भारतातील चित्रपटरसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री जुही चावला हिच्या एका वेगळ्या भूमिकेवर न्यायालयाने मात्र नाराजी व्यक्त केली आहे. ही भूमिका अर्थातच अभिनयाची नसून व्यवहारातील आहे. 5G प्रकरणात जुही चावला आणि इतर अर्जदारांच्या व्यवहारावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयात न्या. जे.आर. मिधा यांच्या खंडपिठासमक्ष या प्रकरणावर सुनावणी होती. अत्यंत नम्रपणे दंडाची रक्कम भरण्यासाठीही आपण लोक तयार नाहीत, याचे आश्चर्य वाटते, असे न्यायाधीश म्हणाले. जुही आणि इतर लोकांवर 20 लाख रुपयांचा दंड लावताना अवमानना कारवाई न करण्याचा पवित्रा न्यायालयाने घेतला होता, हे आपण विसरलात, याचीही न्यायालयाने आठवण करून दिली.
5G प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या जुही चावलावर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. यासोबतच न्यायालयाने कठोर शब्दांत ताशेरेही ओढले होते. जुहीची बाजू मांडण्यासाठी ज्येष्ठ वकील मीत मल्होत्रा उपस्थित झाले त्यावेळी न्यायालयाने त्यांच्या व्यवहाराबाबत आश्चर्य व्यक्त केले.
मल्होत्रा यांनी अर्ज परत घेताना दंडाची रक्कम एक आठवड्यात भरण्यात येईल किंवा कायद्याचा आधार घेतला जाईल, असे न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालय भडकले. एकीकडे निरर्थक अर्ज दाखल करायचा आणि दुसरीकडे दंडही भरायचा नाही. तुम्ही म्हणता की न्यायालयाला दंड लावण्याचा अधिकार नाही, पण न्यायालयाकडे अवमानना नोटीस जारी करण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने बजावले. त्याचवेळी जुहीच्या दुसऱ्या वकिलांनी कोर्ट फी भरल्याची माहिती न्यायालयात दिली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली; पत्रकार परिषद रद्द

Next Post

…म्हणून प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढले

Next Post
javdekar prasad

...म्हणून प्रकाश जावडेकर आणि रविशंकर प्रसाद यांना मंत्रिमंडळातून काढले

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

cbi

सीबीआयने सहाय्यक अधीक्षकासह एकाला केली अटक

जून 15, 2025
Untitled 39

केदारनाथ हेलिकॅाप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील जयस्वाल कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू

जून 15, 2025
Untitled 38

केदारनाथमध्ये हेलिकॅाप्टर अपघातात ७ जणांचा मृत्यू

जून 15, 2025
sucide

आत्महत्येची मालिका सुरूच….वेगवेगळया भागात राहणा-या चार जणांनी केली आत्महत्या

जून 15, 2025
Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011