इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रियकर सोहेल कथुरियासोबत दाक्षिणात्य अभिनेत्री हंसिका मोटवानी लग्नबंधनात अडकली. राजस्थानमधील मुंडोता फोर्ट आणि पॅलेसमध्ये सिंधी रितीरिवाजानुसार तिचा विवाह संपन्न झाला. लग्नानंतर या नवदाम्पत्याचे मुंबई विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी हंसिकाला माध्यमांनी विचारले असता ती म्हणाली की मी प्रचंड खुष आहे. तर, हनीमूनच्या प्रश्नावर मात्र तिला तिचे हसूच आवरता आले नाही.
बॉलिवूडमध्ये अनेक दिवसांपासून या लग्नाची चर्चा सुरू होती. ४ डिसेंबरला हंसिकानं जयपूर येथील मुंडोता फोर्टमध्ये सोहेल सोबत सात फेरे घेतले. ४५० वर्ष जुन्या किल्ल्यात हंसिकाचा लग्नसोहळा पार पडला आहे. कुटुंबिय आणि जवळच्या मित्र-मंडळींनी तिच्या लग्नसोहळ्यात हजर होते. नवरीच्या थाटात सजलेल्या हंसिकाचे लग्नातील फोटो व्हायरल झाले आहेत. हंसिका – सोहेलच्या मेहंदी, संगीत आणि हळदीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
हंसिका मोटवानी एक लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. बालकलाकार म्हणून तिने मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. ‘शक लाका बूम बूम’, ‘सास भी कभी बहू थी’ आणि ‘सोन परी’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांत हंसिकाने काम केलं आहे. ‘कोई मिल गया’, ‘आपका सरूर’ आणि ‘मनी है तो हनी’ या बॉलिवूड चित्रपटातही ती झळकली आहे. तिच्या या लोकप्रियतेमुळेच तिच्या लग्नाची साऱ्यांनाच उत्सुकता होती.
गेल्या आठवडाभरापासून हंसिका आणि सोहेल यांच्या लग्नाची तयारी सुरू होती. अभिनेत्रीने तिच्या लग्नाआधीच्या सर्व फंक्शनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
https://www.instagram.com/p/ClwRSUsPUVC/?utm_source=ig_web_copy_link
मेंहदी आणि संगीत कार्यक्रमात देखील ती खूप सुंदर होती. तिच्या मित्र मंडळीसोबत तिने फोटो काढले आहेत. हंसिकाच्या लग्नासाठी हा किल्ला खास सजावण्यात आला होता. हंसिका आणि सोहेलने लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाच त्यांनी या पॅलेसवर डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं होतं. लग्नात हंसिका खूपच सुंदर दिसत होती. हंसिकाने लग्नात लाल रंगाचा लेहेंंगा परिधान केलेला आहे. तर सोहेल कथुरिया शेरवानीत दिसला. सोहेलने हंसिकाला पॅरिसमधील आयफेल टॉवरवर प्रपोज केलं होतं, ज्याचे फोटो तिनं इन्स्टाग्राम हॅंडलवर शेअर केले होते.
Actress Hansika Motwani Arrived in Mumbai After Wedding