इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तंत्रज्ञान प्रगत होत गेलं तसं लोकांसाठी सोयी सुविधा वाढत गेल्या. अनेक गोष्टी अगदी हाताच्या एका क्लिकवर उपलब्ध होऊ लागल्या. पण ही जशी याची चांगली बाजू आहे, तसेच याचे काही साईड इफेक्ट्सही आहेत. स्वीगी, झोमॅटो यावरून काहीही मागवलं की ते लगेच आपल्याला मिळत. पण डिलिव्हरी बॉय करत असलेल्या करामती देखील अनेकदा आपण सोशल मीडियावर पाहतो.
स्विगी किंवा झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या बऱ्याच तक्रारी सोशल मीडियावर येत असतात. यात प्रामुख्याने या डिलिव्हरी बॉयची वागणूक हाच महत्त्वाचा मुद्दा असतो. आता पुन्हा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. यात तशी तर डिलिव्हरी बॉयची काहीच चूक नाही. पण याचा फटका एका अभिनेत्रीला बसला आहे. अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने स्वीगीवरून काही ऑर्डर केली होती. मात्र, डिलिव्हरी बॉयचे लक्ष नसताना ती ऑर्डर घेऊनच चोरटे पसार झाले.
गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये पेट्रोल पंपाजवळील सीसीटीव्ही फूटेज आहे. ज्यामध्ये डिलिव्हरी बॉयच्या गाडीतून दोन माणसांनी कशा प्रकारे फूड चोरले हे दिसत आहे. स्वत: डिलिव्हरी बॉयने हा व्हिडीओ गौतमीला दाखवला. विशेष म्हणजे, डिलिव्हरी बॉयनेच हा व्हिडीओ गौतमीला दाखवला. याचबरोबर गौतमीने या पोस्टद्वारे लोकांच्या वृत्तीवरही टिप्पणी केली आहे.
एका पेट्रोल पंपावर स्विगी डिलिव्हरी बॉयची गाडी उभी आहे. गाडीचा मालक दूर असल्याने दोघं अज्ञातांनी गाडीवरच्या बॅगेतून पार्सल उचललं आणि ते तिथून पसार झाले. या व्हिडिओमध्ये त्या दोघांचे चेहेरे देखील दिसत आहेत. त्यांना रंगे हात पकडल्याचा हा व्हिडिओ गौतमीने शेअर केला असून तिला तो संबंधित डिलिव्हरी बॉयने दिला आहे.
आपल्या पोस्टमध्ये गौतमी लिहीते, “तिरामीसु ही माझी आवडती डिश ऑर्डर केली. १ तास वाट पाहिल्यावर मी जेव्हा डिलिव्हरी बॉयला फोन केला तेव्हा मला माझं पार्सल चोरीला गेल्याचं समजलं. प्रथम माझा यावर विश्वासच बसला नाही. नंतर मला डिलिव्हरी बॉयने हा व्हिडिओ पाठवला. एखाद्याचं अन्न असं चोरायचं आणि त्यावर हसणं हे निर्लज्जपणाचं लक्षण आहे.” ही पोस्ट लिहून तिने स्विगी आणि मुंबई पोलिस यांनादेखील टॅग केलं आहे. गौतमीची ‘माझा होशील ना’ ही मालिका गाजली होती. या मालिकेतील तिची सई ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरली होती. गौतमी एक उत्तम गायिका देखील आहे.
Actress Gautami Deshpande Online Food Order Theft Video