इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पाकिस्तानी अभिनेता फवाद खान हा सध्या चर्चेत आहे. फवादचा ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, फवाद हा सध्या या चित्रपटामुळे चर्चेत नसून त्याच्या एका विधानामुळे चर्चेत आला आहे. फवाद खानची एक मुलाखत नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. खरं तर फवाद खान आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. पण या मुलाखतीत त्याने केलेल्या खुलाशाने अनेकांना धक्का बसला आहे. या मुलाखतीमध्ये फवादने अत्यंत मोठा खुलासा केला आहे.
फवाद खान याने एका चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला मात्र याचा फटका बसला. अभिनेता आमीर खान याचा आदर्श ठेवत आपण हे केल्याचे तो सांगतो. पण, या नादात त्याला रुग्णालयाची वारी करावी लागली. फवाद खानने ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या चित्रपटासाठी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर पुढे काय झाले हे फवाद यानेच एका मुलाखतीमध्ये सांगितले. या चित्रपटात फवादला एका फायटरची भूमिका साकारायची होती. यासाठी त्याने ७५ किलो वजन थेट १०० किलोवर नेले. त्यानंतर त्याला थेट रूग्णालयात दाखल व्हावे लागल्याचे फवादने सांगितले.
फवादने यासाठी आमिर खान याचा आदर्श समोर ठेवला. यामध्ये त्याला काही यश मिळाले नाही आणि प्रमाणाबाहेर वजन वाढल्याने त्याला रूग्णालयात जावे लागले. फवादने सांगितले की, या वजन वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे त्याच्या आरोग्यावर फार वाईट परिणाम झाला. यामुळे फवादला मधुमेहदेखील झाला. यातून बरे होण्यासाठी फवादला तब्बल तीन महिन्यांचा कालावधी लागलाय. फवाद सांगतो की, या वजन वाढवण्याच्या प्रक्रियेत माझ्या शरीरावर खूप घातक परिणाम झाले.
Actress Fawad Khan Body Transformation Hospital