इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी बराच काळ रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेक दिवसांपासून याच चर्चा सर्वत्र आहेत. पार्टी, सार्वजनिक ठिकाणी या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलं आहे. आता कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या लग्नासाठी त्यांनी एक खास ठिकाण निवडल्याचं देखील समोर आलं आहे. हा विवाहसोहळा पुढील वर्षी होणार आहे.
सिद्धार्थ आणि कियारा अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नासाठी ठिकाण शोधत असल्याचं समोर आलं होतं. आता त्यांना त्यांचं मनाजोगतं ठिकाण सापडलं आहे. यापूर्वी हे दोघे दिल्लीत लग्न करणार होते. आता त्यांनी लग्नस्थळ बदललं आहे. त्यांचा लग्नसोहळा अत्यंत खासगीत होणार असून केवळ नातेवाईक आणि निकटवर्तीयच या सोहळ्याला उपस्थित राहतील.
कियारा आणि सिद्धार्थ यांनी आपल्या लग्नाचे डेस्टिनेशन म्हणून चंदीगड येथील एक हॉटेल ठरवले आहे. ‘फिल्मफेअर’ने यासंबंधातील वृत्त दिले आहे. चंदीगडमधील ओबेरॉय सुखविलास हॉटेलमध्ये त्यांचा विवाह सोहळा रंगणार आहे. तर लग्नानंतर मुंबईत ग्रॅण्ड रिसेप्शनही होणार आहे. गंमत म्हणजे सिद्धार्थ किंवा कियाराने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
या विवाह सोहळ्याला बॉलिवूडमधीलही विकी कौशल, कतरिना कैफ, वरुण धवन, जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंग यांच्यासह अन्य लोकप्रिय कलाकार उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय काही जवळचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांना देखील निमंत्रणे दिली गेली असण्याची शक्यता आहे. यांनाही ते त्यांच्या लग्नाचं निमंत्रण देण्याची शक्यता आहे.
Actor Siddharth Malhotra Actress Kiara Advani Wedding Destination