मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीव्ही इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री तुनिषा शर्माच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. तिच्या आकस्मिक मृत्यूच्या गूढतेत तिचा सहकलाकार शीजान खानचे नाव समोर आले आहे. तुनिषा शर्माच्या आईने शीजन खानविरुद्धत क्रार दिल आहे, त्यानंतर मुंबई पोलिसांनी शीजन खानला अटक केली. तुनिषा शर्माच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दरम्यान, येथील जे जे रुग्णालयात तुनिषाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले.
पोस्टमॉर्टमनंतर तुनिषाचा मृतदेह रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. आज, रविवारी 25 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दुसरीकडे, या प्रकरणी आरोपी अभिनेत्याला आयपीसी कलम 306 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. आता त्याला न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
तुनिषा शर्माच्या आईचा आरोप
मृत तुनिषा शर्मा प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, ‘अलिबाबा नावाच्या शोमध्ये काम करणारी अभिनेत्री तुनिषा शर्माने शोमधील मेकअप रूमच्या स्टुडिओमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर आईच्या आरोपाच्या आधारे एफआयआर नोंदवला असून पुढील कारवाई करणार आहे. मृताच्या आईने अभिनेता शीजान खानवर आरोप केला आहे. तुनिषाचे शीजनसोबत अनैतिक संबंध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यामुळे नैराश्येला बळी पडून तिने आत्महत्या केली. आईच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे. पोलीस या प्रकरणाचा खून आणि आत्महत्या या दोन्ही कोनातून तपास करणार आहेत. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
कोण आहे शीजान खान
शीजान खानचे पूर्ण नाव शीझान मोहम्मद खान आहे. तुनिषा शर्माच्या आधी त्याचे नाव ‘कुंडली भाग्य’ अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबत जोडले गेले होते. ‘जोधा अकबर’च्या शूटिंगदरम्यान जखमी झाल्याने शीझान चर्चेत आला होता. यामध्ये त्याचा पाय आणि अंगठा फ्रॅक्चर झाला होता.
Actor Sheezan Khan Arrested in Actress Tunisha Sharma Death Case
TV Serial Entertainment