India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

शाहरुख खानची पत्नी गौरी खानविरोधात गुन्हा दाखल; हे आहे प्रकरण…

India Darpan by India Darpan
March 3, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान अनेक वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला. आणि त्याचा ‘पठाण’ मोठ्या पडद्यावर चांगलाच यशस्वी झाला. त्यापूर्वीच शाहरुख खान आणि त्याचे कुटुंबीय एका मोठ्या संकटातून बाहेर आले होते. ड्रग्स प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातून आर्यन खानची सुटका झाली. आता सुद्धा ‘पठाण’च्या यशाने शाहरुख खान आनंदी असतानाच त्याला काळजीत टाकणारी एक घटना घडली आहे. शाहरुखची पत्नी गौरी खानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

गौरीविरोधात उत्तर प्रदेशमधील लखनऊ इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखनऊमध्ये गौरी खानसह ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौरी खान तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडची ब्रँड अँबेसेडर आहे. मुंबईचे रहिवासी असलेल्या किरीट शाह नावाच्या एका व्यक्तीने लखनऊमधील या प्रकल्पात फ्लॅट खरेदी केला. मात्र, ८६ लाख रुपये देऊनही आतापर्यंत फ्लॅट मिळाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. गौरी खानवर पैसे हडपल्याचा आरोप करत त्याने लखनऊ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे गौरी खानविरुद्ध भादंवि कलाम ४०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या व्यक्तीने मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार तुलसियानी आणि तुलसियानी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे संचालक महेश तुलसियानी यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला आहे. गौरी खानने केलेल्या जाहिरातीमुळे आपण हा फ्लॅट घेतल्याचंही तक्रारकर्त्याने म्हटले आहे.

Actor Shahrukh Khan Wife Gauri Khan Fir Registered


Previous Post

ठाण्याच्या वाहतूक कोंडीबाबत विधान भवनात विशेष बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले हे महत्त्वाचे निर्णय

Next Post

जळगावच्या रेमंड कंपनी कामगारांबाबत मंत्री सुरेश खाडे म्हणाले…

Next Post

जळगावच्या रेमंड कंपनी कामगारांबाबत मंत्री सुरेश खाडे म्हणाले...

ताज्या बातम्या

रेशीम शेती एकरात… मिळेल पैसा लाखात….

March 24, 2023

वॉशिंग मशीन…. गुजरात निरमा…. बॅनरने वेधले विधिमंडळात सर्वांचे लक्ष

March 24, 2023

धक्कादायक! सर्वात मोठे डेटा लीक उघड… १.२ कोटी WhatsApp, १७ लाख Facebook युजर्सचा डेटा चोरीला… ७ जणांना अटक

March 24, 2023

महाराष्ट्रातील या ९ शहरांमध्ये राबविला जाणार स्वच्छ हवा कार्यक्रम

March 24, 2023

हे आहेत महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्र भूषण’… आजवर यांचा झाला सन्मान

March 24, 2023

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 24, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group