India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

अभिनेता सतीश कौशिक यांच्या मृत्यूसंदर्भात मॅनेजर संतोष ने केला हा महत्त्वाचा खुलासा… तर, मैत्रिणीचा खळबळजनक दावा

India Darpan by India Darpan
March 12, 2023
in मुख्य बातमी
0

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अभिनेता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे. चौकशीदरम्यान त्यांचे व्यवस्थापक संतोष राय यांनी फार्म हाऊसवर दुपारी 3 नंतर पार्टी झाली नसल्याचा खुलासा केला आहे. सेलिब्रेशन करून सतीश फार्म हाऊसमधील आपल्या खोलीत गेले होते. त्यानंतर ते रात्री ९.३० वाजता जेवायला आले. जेवण झाल्यावर ते पुन्हा त्यांच्या खोलीत गेले. तिथे ते आयपॅडवर चित्रपटाच्या क्लिप बघू लागले. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी संतोष राय यांना फोन करून त्यांची प्रकृती अस्वास्थ्याबाबत सांगितले. मला अस्वस्थ वाटत असून छातीत दुखत असल्याचे ते म्हणाले असे व्यवस्थापक राय यांनी पोलिसांना सांगितले आहे. दरम्यान, कौशिक यांच्या मैत्रिणीने खळबळजनक खुलासा केला आहे.

रायने घाईघाईने सतीश यांना गुरुग्राममधील फोर्टिस रुग्णालयात नेले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराचा झटका हे त्यांच्या मृत्यूचे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दक्षिण-पश्चिम जिल्ह्याचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त राजीव कुमार, सतीश कौशिकचे व्यवस्थापक संतोष राय यांनी सांगितले की, 8 मार्च रोजी सकाळी 10.00 वाजता सतीश हे बिल्डर मित्र विकास मालूच्या ए-5, पुष्पांजली, बिजवासन येथील फार्म हाऊसवर पोहोचले होते. पार्टीसाठी तेथे आधीच अनेक लोक उपस्थित होते. येथे होळी पार्टी झाली. तीन वाजेपर्यंत इथे पार्टी होती. यानंतर इतर लोक निघून गेले तर सतीश खोलीत गेले. यानंतर कोणतीही पार्टी आयोजित केली नाही, असे राय म्हणाला.

सतीश यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवून पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. क्राइम टीम व्यतिरिक्त एफएसएल टीमने फार्म हाऊसमधून पुरावे गोळा केले, मात्र टीमला काही औषधांशिवाय काहीही सापडले नाही. पोलीस सतीशच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत. सध्या त्याचा मृत्यू अगदी नैसर्गिक वाटत आहे. पोलिसांनी 174 CrPC अंतर्गत कारवाई केली आहे.

सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. 1972 मध्ये त्यांनी दिल्लीच्या किरोरी माल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. तेथे असताना त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा आणि एफटीआयआयमध्येही शिक्षण घेतले. अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. सतीश कौशिक यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सतीश कौशिक यांनाही महामारीदरम्यान कोविडची लागण झाली होती.

मैत्रिणीचा खळबळजनक खुलासा
दरम्यान, कौशिक यांच्या मैत्रिणीने दिल्ली पोलिसांकडे खळबळजनक खुलासा केला आहे. कौशिक यांचे मित्र तथा बिल्डर विकास मालू यांची ती पत्नी ही कौशिक यांची मैत्रिण आहे. तिचे म्हणणे आहे की, १५ कोटी रुपयांच्या वादातून कौशिक यांची हत्या झाली आहे. बिल्डर विकास हे कौशिक यांचे १५ कोटी रुपये परत देत नव्हते. त्यांच्याकडे पैसे नव्हते. यातूनच ही हत्या झाल्याचे तिचे म्हणणे आहे. पोलिस आता या प्रकरणाचा तपास करीत आहेत

Actor Satish Kaushik Death Case Manager and Friend Statement


Previous Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

गुलाम नबी आझाद, भाजप प्रदेशाध्यक्ष, माजी आमदारांसह अनेकांचे वीज कनेक्शन तोडले… जम्मूत जोरदार कारवाई…

Next Post

गुलाम नबी आझाद, भाजप प्रदेशाध्यक्ष, माजी आमदारांसह अनेकांचे वीज कनेक्शन तोडले... जम्मूत जोरदार कारवाई...

ताज्या बातम्या

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

March 22, 2023

अभिनेता दीपक तिजोरीची तब्बल अडीच कोटींची फसवणूक; गुन्हा दाखल

March 22, 2023

ट्रोल झाल्यानंतर अखेर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागितली माफी

March 22, 2023

‘आता बोलायची वेळ आली आहे’, भाजप नेत्या पंकज मुंडे यांचा इशारा; पण कुणाला?

March 22, 2023

ऑटोरिक्षा चालक-मालक यांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सरकार म्हणाले…

March 22, 2023

राज्याच्या अर्थसंकल्पात पुण्याला नेमकं काय मिळालं?

March 22, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Join WhatsApp Group