India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

…. म्हणूनच घेतला भयपट करण्याचा निर्णय; दिग्दर्शक विराजस कुलकर्णीने व्यक्त केले मत

India Darpan by India Darpan
January 13, 2023
in मनोरंजन
0

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – मराठी चित्रपटसृष्टीत आता वेगळ्या पठडीतले अनेक चित्रपट येताना दिसतात. नेहमीच्या मळलेल्या वाटेवरून जाण्यापेक्षा वेगळी वाट चोखाळण्याचा अनेक दिग्दर्शकांचा प्रयत्न असतो. आणि प्रेक्षकांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसतो. चित्रपटसृष्टीत वेगळे प्रयोग होत असले तरी भयपटांची फारशी निर्मिती होताना दिसत नाही. नेमका हाच वेगळा विषय घेत दिग्दर्शक विराजस कुलकर्णी याने एक नवीन चित्रपट आणला आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत फारसे भयपट येत नाहीत. त्यामुळे मराठी प्रेक्षकांना आवडेल असा अनुभव देणारा भयपट करावा अशी इच्छा मनात ठेवून ‘व्हिक्टोरिया’ हा चित्रपट दिग्दर्शित करायचे ठरवले, असे अभिनेता-दिग्दर्शक विराजस कुलकर्णी याने सांगितले. विराजसचे दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘व्हिक्टोरिया’ हा भयपट नुकताच राज्यभरात प्रदर्शित झाला आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा विराजस कुलकर्णीने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकले आहे. दिग्दर्शनाच्या पहिल्याच प्रयत्नात भयपट निवडण्यामागचे कारण उलगडताना तो म्हणतो, ‘मी स्वत: सुद्धा अनेक भयपट पाहतो. मला प्रचंड भीती वाटेल असाच चित्रपट मला प्रेक्षकांच्या भेटीला आणायचा होता.’ ‘माझा होशील ना’ ही झी मराठी वाहिनीवरील मालिका आणि ‘हॉस्टेल डेज’, ‘माधुरी’, ‘हॉर्न ओके प्लीज’ अशा चित्रपटातून विराजसने उत्तम अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. आता ‘व्हिक्टोरिया’च्या माध्यमातून त्याने दिग्दर्शनाच्या नवीन क्षेत्रात वाटचाल सुरू केली आहे.

अभिनयानंतर लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रातही आवड निर्माण आल्याने त्याने पहिल्यांदा नाटक दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. या निमित्ताने त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या नाटकाची गंमत शेअर केली. ‘मी माझ्या जीवनातील पहिले नाटक दिग्दर्शित केले तेही भयनाट्य होते. ‘ॲनाथमा’ असे त्या नाटकाचे नाव होते आणि दिग्दर्शनासोबत मी त्यात अभिनयही करत होतो. हे भयनाट्य रंगभूमीवर सादर करत असताना प्रेक्षकांना हा नाट्यप्रकार आवडतो हे मी जवळून अनुभवल्याचे विराजस सांगतो. मात्र ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाचे कथालेखन सुरू असताना ती रहस्यमय शैलीत लिहिली गेली होती, नंतर पटकथा लेखन करताना हा एक उत्कृष्ट भयपट होऊ शकतो असे वाटल्यानेच त्या पध्दतीने चित्रपटाच्या पटकथेची मांडणी करण्यात आल्याचे विराजसने सांगितले.

दरम्यान, सलग वीस दिवस स्कॉटलंडमध्ये तेही कडाक्याची थंडी असताना चित्रीकरण पूर्ण करून आणि कमीत कमी खर्चात उत्तम व्हीएफएक्स साधून हा चित्रपट केला असल्याचे विराजसने सांगितले. या चित्रपटात पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Actor Director Virajas Kulkarni Horror Film


Previous Post

…आणि अभिनेत्री निवेदिता सराफ झाल्या भावूक (बघा व्हिडिओ)

Next Post

इंडिया दर्पण – विचार धन – वाचा आणि नक्की विचार करा

Next Post

इंडिया दर्पण - विचार धन - वाचा आणि नक्की विचार करा

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आज रागावर नियंत्रण ठेवावे; जाणून घ्या, रविवार, २९ जानेवारी २०२३चे राशिभविष्य

January 28, 2023

आज आहे या मान्यवरांचा वाढदिवस – रविवार – २९ जानेवारी २०२३

January 28, 2023

इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम

January 28, 2023

अतिशय मानाचा आणि तब्बल १ लाख रुपयांचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बगे यांनी जाहीर

January 28, 2023

प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांचे काय चालले आहे माहित नाही – शरद पवार

January 28, 2023

मालेगाव येथे पठाण चित्रपट बघतांना चाहत्यांनी सिनेमागृहामध्येच केली फटाक्यांची अतिशबाजी (बघा व्हिडिओ)

January 28, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group