येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नगर – मनमाड महामार्गावर नांदेसर रेल्वे गेट समोरील म्हसोबा मंदिराजवळ वाळू वाहतूक करणारा ट्रक व रिकाम्या ट्रेलरचा अपघात झाला. या अपघातात ट्रेलर चालक योगेंद्र कुमार (रा. जगतपुर, उत्तर प्रदेश) हा जागीच ठार झाला आहे. ट्रलने पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. बुधवार पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या घटनेची माहिती शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी दिलीप शिंदे, सागर वाघावकर यांना समजताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. येथे नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आले. या अपघाताची नोंद शहर पोलिसात करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक हेंबाडे करत आहेत.