इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – नाशिक महामार्गावरील पडखा गावाजवळ खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका आठ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहे. यातील जखमींवर सघ्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की, या खासगी बसमध्ये २० प्रवासी होते, यातील बस चालक अतीवेगाने बस चालवत असल्याने त्याला अंदाज आला नाही. त्यामुळे ही बस उड्डाणपुलाखालील बोगद्याला धडकली. त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातातील कुटुंबिय हे भिवंडीतील आहे. ते खडवली येथे पिकनिकसाठी गेले होते.
या अपघातानंतर भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख हे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी जखमींची विचारणा केली. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर आहे.