इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भामटा राजपुत जातीचे प्रमाणपत्र काढुन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व नायब तहसिलदार संजय शिंदे यांचे करीता ३० हजार रुपये लाच घेणा-या वाल्मीक प्रताप सिंग झाल्टे (राजपूत) यााल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशव्दारा समोर त्याने पंचासमक्ष ही लाच स्विकारला. याप्रकरणी धुळे शहर पो. स्टे. येथे भ प्र अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईची एसीबीने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांच्या नातु व नातीचे भामटा राजपुत जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याकरीता त्यांनी उपविभागीय अधिकारी, धुळे भाग धुळे यांचेकडे ऑनलाईन अर्ज केला होता. सदर प्रकरणास सहा महिने होऊन देखील जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने तक्रारदार व त्यांचे भाचे मनोज पवार हे उपविभागीय अधिकारी कार्यालयात ३० मे रोजी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेण्यासाठी गेले असता तेथे त्यांना आरोपी भेटले. त्यांनी तक्रारदार यांना उपविभागीय कार्यालयात त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असून तक्रारदार यांच्या नातुंचे भामटा राजपुत जातीच्या प्रत्येक दाखल्याचे प्रत्येकी १५ हजार रुपये याप्रमाणे एकुण ३० हजार रुपये दयावे लागतील. त्यातुन प्रांत साहेब, नायब तहसिलदार संजय शिंदे व कार्यालयातील कर्मचारी हे माझ्याकडुन सदरचे पैसे घेऊन तुमचे काम करुन देतील. ते प्रत्यक्ष तुम्हाला भेटणार नाहीत असे सांगितल्याची तक्रारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली होती.
या तक्रारीनंतर २ जून रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपीने तकारदार यांच्या नातुंचे भामटा राजपुत जातीचे प्रमाणपत्र काढुन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व नायब तहसिलदार संजय शिंदे यांचे करीता ३० हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशव्दारा समोर पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून धुळे शहर पो. स्टे. येथे भ प्र अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे,
यशस्वी सापळा कारवाई
*युनिट – ला.प्र.वि. धुळे
*तक्रारदार- पुरुष, 47 वर्ष.
आरोपी– 1) वाल्मीक प्रताप सिंग झाल्टे (राजपूत), वय- 47 वर्ष, व्यवसाय- शेती, रा. मु. पो. दहयाने, ता. जि. धुळे . ह. मु. दत्तनगर गजानन महाराज मंदिराच्या मागे मोहाडी उपनगर ता. जि. धुळे
लाचेची मागणी-दिनांक 02.06.2025 रोजी 30,000/- रु.
*लाच स्वीकारली – दिनांक 02.06.2025 रोजी 30,000/- रु.
लाचेचे कारण – यातील तक्रारदार यांच्या नातु व नातीचे भामटा राजपुत जातीचे जात प्रमाणपत्र मिळण्याकरीता त्यांनी उपविभागीय अधिकारी, धुळे भाग धुळे यांचेकडे ऑनलाईन अर्ज केला होता. सदर प्रकरणास 06 महिने होवुन देखील जातीचे प्रमाणपत्र न मिळाल्याने तक्रारदार व त्यांचे भाचे मनोज पवार हे उपविभागीय अधिकारी कार्यालयात दि. 30.05.2025 रोजी उपविभागीय अधिकारी यांची भेट घेण्यासाठी गेले असता तेथे त्यांना आरोपी भेटले. त्यांनी तक्रारदार यांना उपविभागीय कार्यालयात त्यांचे सर्वांशी चांगले संबंध असुन तक्रारदार यांच्या नातुंचे “भामटा राजपुत जातीच्या प्रत्येक दाखल्याचे प्रत्येकी 15,000/- रुपये याप्रमाणे एकुण 30,000/- रुपये दयावे लागतील. त्यातुन प्रांत साहेब, नायब तहसिलदार संजय शिंदे व कार्यालयातील कर्मचारी हे माझ्याकडुन सदरचे पैसे घेवुन तुमचे काम करुन देतील. ते प्रत्यक्ष तुम्हाला भेटणार नाहीत” असे सांगितल्याची तक्रारदार यांनी ला.प्र.वि. धुळे कार्यालयात तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची दि.02.06.2025 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता आरोपीने तकारदार यांच्या नातुंचे भामटा राजपुत जातीचे प्रमाणपत्र काढुन देण्यासाठी उपविभागीय अधिकारी व नायब तहसिलदार संजय शिंदे यांचे करीता 30,000/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम धुळे रेल्वे स्टेशनच्या प्रवेशव्दारा समोर पंचासमक्ष स्विकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून धुळे शहर पो. स्टे. येथे भ प्र अधिनियम कलमाने गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
*सापळा परिवेक्षण अधिकारी – *श्री. सचिन साळुंखे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.विभाग.धुळे
मो. न. 9403747157, 9834202955
सापळा व तपासी अधिकारी – रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक, ला. प्र. विभाग, धुळे
*सापळा पथक – पो.हवा. राजन कदम, पो. कॉ. प्रशांत बागुल, पो. कॉ. रामदास बारेला, चालक पो. कॉ. जगदीश बडगुजर *सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट* .