नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शेतामध्ये PM कृषी योजना अंतर्गत 3HP सोलर बसविण्याचा सर्व्हे करून महावितरण मोबाईल अँप वरून रिपोर्ट वरीष्ठाना पाठविल्याच्या मोबदल्यात १००० हजार रुपयाची लाच घेतांना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा येथील विद्युत कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण सुर्यवंशी एसीबीच्या जाळ्यात अडकले.
या कारवाईबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार यांचे वडिलांचे शेतामध्ये PM कृषी योजना अंतर्गत 3HP सोलर बसविण्याचा सर्व्हे करून महावितरण मोबाईल अँप वरून रिपोर्ट वरीष्ठाना पाठविल्याच्या मोबदल्यात ११ नोव्हेंबर रोजी १५०० रुपये लाचेची मागणी करून आज ९ डिसेंबर रोजी ठाणापाडा म रा वि वि क मर्यादित कार्यालय येथे लोकसेवक प्रवीण सूर्यवंशी यांनी तडजोडी अंती बक्षीस स्वरुपात लाच म्हणुन १ हजार रुपये स्वतःसाठी स्विकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्या विरुध्द हरसूल पोलीस स्टेशनं येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यशस्वी सापळा कारवाई’’
-’युनिट .’ नाशिक
- ’तक्रारदार.’ पुरूष वय 26 वर्षे
- आलोसे. श्री प्रवीण जगन्नाथ सूर्यवंशी वय 43 वर्षे, व्यवसाय-नोकरी वरिष्ठ तंत्रज्ञ,ठाणा पाडा सेक्सन, म रा वि वि क मर्यादित ता त्रंबकेश्वर जि नाशिक वर्ग-3,
-’लाचेची मागणी – 1500/-तडजोड 1000 - ’लाच स्विकारली – 1000/-
- ’हस्तगत रक्कम. 1000/-
- ’लालेची मागणी – दिनांक 11/11/2024 रोजी
- ’लाच स्विकारली – दिनांक 9/12/2024रोजी
तक्रार-यातील तक्रारदार यांचे वडिलांचे शेतामध्ये PM कृषी योजना अंतर्गत 3HP सोलर बसविण्याचा सर्व्हे करून महावितरण मोबाईल अँप वरून रिपोर्ट वरीष्ठाना पाठविल्याच्या मोबदल्यात दि 11/11/2024 रोजी 1500रुपये लाचेची मागणी करून आज दि 9/12/2024 रोजी ठाणापाडा म रा वि वि क मर्यादित कार्यालय येथे लोकसेवक प्रवीण सूर्यवंशी यांनी तडजोडी अंती बक्षीस स्वरुपात लाच म्हणुन 1000/- रु स्वतःसाठी स्विकारली असता, रंगे हाथ पकडण्यात आले असुन, आलोसे यांचे विरुध्द हरसूल पोलीस स्टेशनं , नाशिक ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
- आलोसे यांचे सक्षम अधीकारी मा कार्यकारी अभियंता म रा वि वि क मर्यादित नाशिक
- हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
- ’सापळा अधिकारी – श्रीमती स्वाती पवार पोलीस उप अधीक्षक ला. प्र. वि. नाशिक
- ’सापळा पथक – पो. हवा शरद हेंबाडे ,पो. ना युवराज खांडवी, चापो हवा विनोद पवार