नाशिक – जायखेडा पोलिस ठाणे येथील दाखल गुन्ह्यात अटक न करण्याकरिता ३० हजाराची लाचेची मागणी करुन स्वीकारण्याचे मान्य केले म्हणून लाच लुचपत प्रतिबंध विभागाने पोलिस शिपाई सचिन राजेंद्र पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ३० जुलै रोजी ही मागणी करण्यात आली होती. त्यानंतर चौकशी करुन हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात लाचेची मागणी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात समोर येत असून त्यात कारवाई होत आहे. पण, तरी याची फारशी भीती लाच मागणा-या कर्मचा-यांना नाही. पोलिस स्थानकात हे प्रकार वाढले आहे. या कारवाईत हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून फोटोग्राफ घेण्यात आले आहेत. ही कारवाई सापळा अधिकारी संदीप साळुंखे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.,नाशिक) सापळा पथकातील पोलिस हवालदार पंकज पळशीकर,नितीन कराड, प्रभाकर गवळी, वैभव देशमुख, संतोष गांगुर्डे यांनी केली आहे.