नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कळवण तालुक्यातील अभोणा पोलिस स्टेशनमधील हवालदार रमण तुळशीराम गायकवाड याला २ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. अभोणा येथील एका कुटुंबाचे त्यांच्या नातेवाईकांशी भांडण झाले होते. याप्रकरणी तक्रार आल्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी सामंजस्याी भूमिका घेतली. त्यानुसार आपापसातील वाद मिटविले. याप्रकरणी दाखल गुन्ह्यानुसार न्यायालयात पुढील प्रक्रिया न होण्यासाठी दोन्ही बाजूंकडे प्रत्येकी १ हजार रुपयांची मागणी केली. त्यामुळे संबंधितांनी ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) कळविली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार हवालदार गायकवाड याने अभोणा पोलिस स्टेशनमध्येच २ हजार रुपयांची लाच स्विकारली. त्याचक्षणी गायकवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी गायकवाडवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे गुन्हा आहे. यासंदर्भात तक्रार करण्यासाठी एसीबीच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन एसीबीने केले आहे.