मुंबई – बॉलिवूड सेलिब्रिटी नेहमीच आपले किंवा कुटुंबीयांचे वाढदिवस साजरा करण्यासाठी किंवा व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असतात. विविध ठिकाणचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून सेलिब्रिटीज आपल्या फॅन्सना माहिती देत असतात. असेच फोटो अभिनेता अभिषेक आणि ऐश्वर्या रॉय बच्चन यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. ते कुठे आणि का गेले आहेत ते पाहूयात.
मुलगी आराध्या बच्चन हिच्या दहाव्या वाढदिवसानिमित्त सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन पती आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत सुट्टी घालविण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचले आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचे फॅन्स त्यांच्या व्हॅकेशनचे फोटो पाहण्यास उत्सुक आहेत. मालदीवच्या आलिशान रिसॉर्टमध्ये हे सुपरस्टार जोडपे थांबलेले आहे. तेथील मनोरंजक आणि आश्चर्यचकित करणार्या गोष्टी समोर आल्या आहेत. या रिसॉर्टचे काही फोटो ऐश्वर्या आणि अभिषेकने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.
लाखोंची किंमत
ऐश्वर्या, अभिषेक आणि आराध्या सध्या मालदीवमधील अमिला या राजेशाही थाट असलेल्या रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. या रिसॉर्टमध्ये अनेक प्रकारचे व्हिलाज आहेत. त्यामध्ये वॉटर पूल व्हिला, सनसेट पूल व्हिला, लॅगून वॉटर पूल व्हिला आणि मल्टि बेडरूम रेजिडेंसचा समावेश आहे. बहुतांश व्हिला खासगी पूल आणि एका अनोख्या व्ह्यूसह मिळतात. परंतु ऐश्वर्या आणि अभिषेक कोणत्या व्ह्यू असलेल्या व्हिलामध्ये थांबले आहेत हे कळू शकलेले नाही. एका संकेतस्थळाच्या माहितीनुसार, या रिसॉर्टमधील सर्वात स्वस्त व्हिलामध्ये एका रात्रीचे भाडे ७६ हजार रुपये आहे. त्याशिवाय येथील सर्वात महाग व्हिलाची किंमत एक घर खरेदी करण्याच्या किमती समान आहे. त्या व्हिलामध्ये एका रात्रीचे भाडे १० लाख ३३ हजार रुपये एवढे आहे.
फोटो केला शेअर
ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन दोघांनीही इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिलाच्या आपल्या खोलीतून सुंदर व्ह्यू शेअर केला होता. या फोटोमध्ये ट्वन स्विमिंग पूल आणि खासगी बिच दिसत होता. रिसॉर्टमधील रोपे आणि नारळाचे झाड व्हयू आणखी सुंदर बनवत होता. हा व्ह्यू शेअर करताना ऐश्वर्याने लिहिले होते, सूर्य…ब्रीज…आणि स्वर्ग.