व्याधीग्रस्त ते थेट आयर्नमॅन. शक्य आहे का? हा व्हिडिओ आवर्जून पहा

नाशिक – मधुमेह, लठ्ठपणासह तब्बल सहा ते सात विकारांनी ग्रासलेली व्यक्ती थेट आयर्नमॅन होऊ शकतो का?

हो. नक्कीच होऊ शकतो.

नाशिकमधील उद्योजक महेंद्र छोरिया यांनी त्यांच्या कर्तृत्वातून तसे करुन दाखविले आहे.

मधुमेहासारख्या विकाराला घाबरण्यापेक्षा त्यालच आपण ताब्यात ठेऊ शकतो, हे त्यांनी सिद्ध करुन दाखविले आहे.

धावपटू, सायकलपटू, जलतरणपटू अशा विविध आघाड्यांवर त्यांनी त्यांचे शारिरीक कसब सिद्ध करीत ऑस्ट्रेलियात जाऊन थेट आयर्नमॅनचा किताब पटकावला आहे.

कसं केलं त्यांनी हे सगळं ? इतर कुणालाही ते शक्य आहे का ?

त्यांच्या यशाचे खरे गमक काय आहे ?

हे जाणून घेण्यासाठी ही मुलाखत आवर्जून पहा…