३६५ दिवस अखंडित कार्यक्रम घेणारे बापू वावरे

 

३६५ दिवस अखंडित कार्यक्रम घेणारे बापू वावरे

नाशिक – तब्बल २८ विविध व्यवसाय व २४ पेट्रोलपंपांचे अकाउंटचे काम केल्यानंतर बापू वावरे आज पेट्रोलपंपाचे मालक झाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून वाट काढत त्यांनी मिळवलेले यश सर्वांना प्रेरणादायी असेच आहे. नाशिकरोड – देवळाली कॅम्पला जोडणा-या लॅम रोडवर त्यांचा दत्त पेट्रोलियम हा एचपी कंपनीचा पंप आहे. या पंपाच्या माध्यमातून ते विविध कार्यक्रम घेत असतात. त्यात ग्राहक सेवेबरोबरच अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमही असतात. गेल्या वर्षी त्यांनी सलग ३६५ दिवस विविध कार्यक्रम घेऊन विक्रम केले. अशा अवलिया बापू वापरे यांची यशोगाथा  इंडिया दर्पण लाइव्हच्या यूट्यूब चॅनलवर.