मनमाड – प्रा. ज्योती बोडके – पालवे यांची कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी नियुक्ती

 

मनमाड – येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यपदी ज्येष्ठ प्राध्यापिका व सध्याच्या पर्यवेक्षक प्रा. ज्योती बोडके पालवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पर्यवेक्षकपदी व्ही. आर. फंड यांना संधी मिळाला आहे. संस्थेचे समन्वयक मार्गदर्शक डॉ.अपूर्व भाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती झाली आहे. प्रा.ज्योती बोडके यांनी मनमाड महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून नियुक्त झाल्या.आज त्याच महाविद्यालयात उपप्राचार्य पदी नियुक्ती केल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्या विद्यार्थी वर्गात अत्यंत प्रिय असून कडक् शिस्तीच्या म्हणून त्या अोळखल्या जातात. महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सेक्रेटरी डॉ. प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ. अपूर्वभाऊ हिरे ,डॉ.अद्वय आबा हिरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. बी.एस. जगदाळे सर वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ.पि.जी.आंबेकर, पर्यवेक्षक बी. एस. देसले, कुलसचिव समाधान केदारे यांच्यासह प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here