अक्षर कविता – विद्या देशमुख यांच्या `घोसला` या हिंदी कवितेचे अक्षरचित्र

सौ. विद्या नितीन देशमुख
अमरावती
M.Sc.B.Ed (B.A. Marathi )
……
कविता, कथा, गझल साहित्य प्रकारात विशेष रूची. अमरावतीच्या कवयित्री विद्या देशमुख यांनी आपल्या कवितेत उदध्वस्त झालेल्या मनाच्या भावभावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाचीच आयुष्यात विशिष्ट स्वप्नं असतात. काहींना भरभरून मिळतं तर काहींच्या हातून वाळूसारखं हे सुख निसटून गेलेलं असतं. परंतु, जगलेल्या त्या चार दोन क्षणांना
माणूस मनाच्या कुपीत जपून असतो. काही गोष्टी आपण बदलवू शकत नसतो. पण त्यातून मिळालेलं ते चिमूटभर सुख त्याला कायम टिकवून ठेवायचं असतं. हाच अट्टहास म्हणजे जीवन. या अशाच काहीशा भावना या कवितेतून व्यक्त झाल्या आहेत. त्यांच्या घोसला या हिंदी कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी….
-विष्णू थोरे, चांदवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here