आजचे राशीभविष्य – शनिवार – १७ ऑक्टोबर २०२०

आजचे राशीभविष्य – शनिवार – १७ ऑक्टोबर २०२०

मेष- अंदाज घेऊनच शब्द द्या
वृषभ- यशस्वी व्हाल
मिथुन- कुछ बाते छोड दो
कर्क- परिस्थितीचा फायदा घ्या
सिंह- डावपेच बोलून दाखवू नका
कन्या-  शॉर्टकट नको
तूळ- रिजनल व्यवसाय प्लॅनिंग
वृश्चिक- बजेट कोलमडेल
धनु- एकतर्फी निर्णय नको
मकर-  एकाच टार्गेटवर विचार करा
कुंभ- वास्तव स्वीकारा
मीन- मनसुबे नको कृती करा
…….
शंकासमाधान
प्रश्न राही – अष्टकूट मिलन म्हणजे काय?
उत्तर- विवाहासाठी वधू-वरांची कुंडली मिलन करताना अष्टकूट मिलन केले जाते यामध्ये वधू-वरांच्या कुंडलीतील  आठ प्रकार एकमेकांशी किती जुळतात ते पाहिले जाते. यालाच अष्टकूट मिलन म्हणतात. यामध्ये आठ प्रकार 36 गुणांमध्ये विभागले आहेत. त्यामध्ये 1)राशी पॅटर्न INCLINATION  दोष नसल्यास 1 गुण. 2) वश्य HARMONY  2  गुण. 3) तारा FORTUNE साठी 3 गुण.. 4) योनी मैत्री ATTRACTION साठी 4 गुण. 5) ग्रहमैत्री PLANET CO-OP साठी 5 गुण. 6) गण मैत्री RELATIONSHIP साठी 6 गुण. 7) भकूट दोष अर्थात राशी कूट HAPPINESS साठी 7 गुण. 8) नाडीदोष- मैत्री STABILITY साठी 8 गुण. असे सर्व मिळून 36  गुण पाहिले जातात. याला अष्टकूट मिलन म्हणतात. यापैकी सर्वाधिक गुण हे नाडी मैत्री – दोष यासाठी दिलेले आहेत. बरेचदा एक नाडी दोष यामुळे विवाह न करण्याचा सल्ला दिला जातो. याविषयी  पुढे सविस्तर चर्चा करू.
डार्क पॅनल टीप-
वास्तूला रंग देताना Dark कॅनल कॉम्बिनेशन करायचे असल्यास पूर्व अथवा उत्तर दिशेसमोरील म्हणजेच पूर्व अथवा उत्तर दिशेचा त्याचप्रमाणे पूर्व मध्य, उत्तर मध्य या दिशांमधून येणारा नैसर्गिक उजेड समोरच्या ज्या भिंतीवर पडतो त्या भिंतीला डार्क रंगाचे पॅनलिंग करू नये. त्यामुळे वास्तूचा चंद्रनाडी प्रवाह विपरीत होतो. याउलट दक्षिण पश्चिमेकडील उजेड ज्या भिंतीवर पडतो, त्या भिंतींना डार्क पॅनल करावे म्हणजे सूर्यनाडी प्रवाह NEUTRALISE  होईल.
आजचा राहू काळ
सकाळी नऊ ते साडे दहा असल्याने शुभ कार्य टाळावीत.
सर्व वाचकांना नवरात्रीच्या शुभेच्छा
पंडित दिनेश पंत
……………………
शंकासमाधान

ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या  WhatsApp नंबरवर पाठवावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here