नाशिक : नोटप्रेसमधील सिक्यूरिटी कॅबीन हातगाडीवर ठेवून चोरून नेणा-याला सुरक्षारक्षकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. निलेश लक्ष्मण वाघमारे (१९ रा.इंदिरानगर झोपडपट्टी आम्रपाली,जेलरोड) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी भास्कर मिसाळ (रा.शिंगवे बहुला) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिसाळ हे आपल्या सहका-यांसमवेत शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास चलार्थ पत्र मुद्रनालय (सीएनपी) च्या भिमनगर गेट भागात पायी पेट्रोलिंग करीत असतांना संशयित पथकाच्या हाती लागला. सीएनपी आवारात ठेवलेली सिक्यूरिटी कॅबीन असलेली लोखंडी टपरी संशयित हातगाडीवर ठेवून चोरून नेतांना मिळून आला. अधिक तपास जमादार गांगुर्डे करीत आहेत.