India Darpan Live
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result

५ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीचे; हे आहेत बेस्ट ५ स्मार्टफोन

India Darpan by India Darpan
December 7, 2021
in राज्य
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो


पुणे – आधुनिक काळात मोबाईल ही उपयुक्तच नव्हे तर अत्यावश्यक वस्तू बनली आहे, त्यामुळे आजच्या काळात प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसतो. अनेक जण विविध प्रकारची कामे मोबाईलवर करतात. भारतीय बाजारपेठेत दररोज अनेक स्मार्टफोन लॉन्च केले जात आहेत, परंतु त्यापैकी बहुतेक मिडरेंज आणि प्रीमियम स्मार्टफोन आहेत. पण आपल्या बजेट 5 हजार रुपये किंवा त्याहून कमी असले तरी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अशाच काही फोनबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांची किंमत सुमारे 5 हजार रुपये आहे.

आयटेल A23 Pro
हा लेक ब्लू फोन असून त्याची किंमत 4,189 रुपये आहे. आपल्याला रोजच्या वापरासाठी बेसिक स्मार्टफोन हवा असेल तर itel A23 Pro खरेदी करता येईल. हा फोन 1 GB रॅम आणि 8 GB स्टोरेजसह देण्यात येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 5-इंचाचा डिस्प्ले आणि 2-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आहे. फोनमध्ये 2400 mAh बॅटरी आहे.

रिडमी Go
या ब्लॅक कलर फोनची किंमत 4,499 रुपये असून रेडमी फोन भारतात खूप लोकप्रिय आहेत. हा फोन 5 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. या फोनमध्ये 5 इंचाचा डिस्प्ले, 1 GB रॅम आणि 8 GB स्टोरेज मिळेल. स्टोरेज 128 GB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन स्नॅपड्रॅगन 425 प्रोसेसरवर काम करतो आणि 3000 mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

आय iCal K260 4G
या फोनची किंमत 4,499 असून कमी बजेटमध्ये मोठा डिस्प्ले असलेला फोन हवा असेल, तर iCal चा K260 हा चांगला पर्याय ठरू शकतो. फोनमध्ये 5.45-इंचाचा डिस्प्ले, 2 GB रॅम , 16 GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 3600 mAh बॅटरी उपलब्ध आहे.

आयटेल A25
याची किंमत: रु 4,559 रुपये असून स्वस्त फोनसाठी लोकप्रिय आहे. 5 हजारांपेक्षा कमी बजेटमध्ये कंपनीचे अनेक फोन उपलब्ध आहेत, त्यापैकी एक Itel A25 आहे. फोनमध्ये 5 इंच डिस्प्ले, 1 GB रॅम आणि 16 GB स्टोरेज आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 3020 mAh बॅटरी आहे.

सॅमसंग M01 कोर
या फोनची किंमत: 4,999 रुपयांमध्ये असून सॅमसंगचा M01 कोर सर्वोत्तम पर्याय असू शकतो. फोनमध्ये 5.3 इंच डिस्प्ले, 1 GB रॅम, 16 GB स्टोरेज आहे. विशेष म्हणजे स्टोरेज 512 GB पर्यंत वाढवता येते. फोनमध्ये 8 मेगापिक्सेल रियर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा मिळेल. हा फोन 3000mAh बॅटरीसह देण्यात येतो.


Previous Post

ऑक्सिजन कमतरतेमुळे १० कोरोना बाधितांचा मृत्यू; दोषींना ३ वर्षांचा तुरुंगवास

Next Post

नाशिकहून या शहरांसाठी सुरू आहे विमानसेवा (बघा, वेळापत्रक)

Next Post
प्रातिनिधीक फोटो

नाशिकहून या शहरांसाठी सुरू आहे विमानसेवा (बघा, वेळापत्रक)

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्यगीत गायनाची नियमावली जाहीर; असे आहेत सरकारचे आदेश

February 2, 2023

FPO का मागे घेतला? गुंतवणूकदारांच्या पैशांचे काय? गौतम अदानी म्हणाले…. (व्हिडिओ)

February 2, 2023

महिलेच्या घरावर दगडफेक करुन वाहनाची तोडफोड करणा-या तीन जणांना पोलिसांनी केले गजाआड

February 2, 2023

बंदी घालण्यात आलेल्या विदेशी मांगूर माश्याचे घरातील हौदात उत्पादन; ३०० किलो मासे जप्त

February 2, 2023

पेट्रोल पंपावरील कामगाराने रोकड घेवून केला पोबारा; गुन्हा दाखल

February 2, 2023
प्रातिनिधिक फोटो

नाशकात गोल्फ क्लब मैदानावर मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचा विनयभंग

February 2, 2023
  • Privacy Policy

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • संमिश्र वार्ता
  • विशेष लेख
  • भेट थेट
  • व्यासपीठ
  • स्थानिक बातम्या
  • व्हिडीओ
  • क्राईम डायरी
  • वाणिज्य

© 2021 Indiadarpanlive Fast growing trustful news portal.

Don`t copy text!
Join WhatsApp Group