नागपूर – सोशल मिडियात एक मेसेज सध्या तुफान व्हायरल झाला आहे. तो म्हणजे, २०२१ या वर्षाचा. हे वर्ष आता संपत आले असले तरी हे वर्ष तब्बल १ हजार वर्षांचा मोठा योग घेऊन आले आहे. सर्वांना प्रश्न पडला असेल की ते कसे काय. पण, ते खरे आहे. त्यासाठी आपल्याला एक साधी सोपी आणि सरळ बेरीज करायची आगे. ती म्हणजे, आपले वय आणि जन्माचे वर्ष यांची. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचे आजचे वय आहे ६४ वर्षे आणि त्यांचे जन्मवर्ष आहे १९५७ तर दोन्ही आकड्यांची केवळ बेरीज करायची आहे. ६४+१९५७ ही केल्यास उत्तर येते २०२१. आणखी एक उदाहरण पाहू, एखाद्या व्यक्तीचे वय आहे ३७ वर्षे आणि त्यांचे जन्म वर्ष आहे १९८४. तर ३७ + १९८४ = २०२१. अशाच पद्धतीने आपणही आपले वय आणि जन्म वर्ष यांची बेरीज करुन पहा. हा योग आता तब्बल १ हजार वर्षांनी येणार आहे. तेव्हा हे करुन पहा आणि त्याचे साक्षीदार व्हा. मात्र, हा मेसेज फसवा आहे. तज्ज्ञांच्या मते असा योग हा दरवर्षीच येतो. त्यामुळे व्हॉटसअॅप किंवा सोशल मिडियातील सर्वच मेसेज खरे असतात असे नाही. त्यामुळे त्याची खात्री करुनच योग्य ती कार्यवाही करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.