मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक श्री गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना केली. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आदी उपस्थित होते.