Last updated on August 8th, 2020 at 08:58 am
आई-वडील व दोन लहान मुलांचा समावेश
नांदगाव – तालुक्यातील वाखारी येथील एकाच कुटुंबातील ४ जणांचा गळा चिरून निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्त्येचे कारण अस्पष्ट असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घराबाहेर झोपलेल्या एकाच कुटुंबातील ४ जणांचा गळा चिरून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यातील वखारी येथे घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. खून झालेल्या मध्ये समाधान चव्हाण,
भरताबाई चव्हाण या पती-पत्नीसह त्यांचा ६ वर्षाचा मुलगा गणेश चव्हाण आणि ४ वर्षाची आरीही चव्हाण यांचा समावेश आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून खून कोणी व का केला याचा तपास सुरू आहे