मुंबई – प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या ते आयसीयुमध्ये आहेत. त्यांच्या प्राथमिक चाचण्या केल्या असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेऊन आहेत. त्यांची पत्नी त्यांच्यासोबत असल्याचे समजते.