नवी दिल्ली – असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे केलेल्या आठ शहरांच्या संयुक्त सर्वेक्षणानुसार, कोरोनाचा वाढणारा प्रादुर्भाव पाहता अजूनही सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करण्यासाठी तयार नसल्याचे समोर आले आहे. जवळपास ७४% कर्मचाऱ्यांनी घरून काम करण्यास पसंती दिली आहे. यात प्रामुख्याने दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, अहमदाबाद आणि पुणे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
आठ शहरांमधील सुमारे ७९ टक्के कर्मचाऱ्यांनी साथीच्या रोगामुळे घरून काम करण्यास पसंती दर्शवली होती. परंतु, देशव्यापी लॉकडाउनवरील निर्बंध हटवल्यानंतर, ७४ टक्के यासाठी सक्षम असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. नियम शिथिल करण्यात आल्याने शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील उपस्थिती वाढ झाली. याच अहवालात पुण्यातील अग्रगण्य असलेल्या माहिती तंत्रज्ञान (आयटीहब)चा देखील समावेश असून तेथील कर्मचाऱ्यांनी देखील घरून काम करण्यास पसंती दिली आहे. तसेच कंपनीच्या इंदूर, भोपाळ, जबलपूर, विजयवाडा, चंदीगड, पाटणा आणि नाशिक येथील तत्सम शाखांनी देखील घरून काम करण्याचे आदेश दिले आहेत. काही कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी घरून काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे कर्मचार्यांना कामाचा अधिक चांगला समतोल साधता येणार आहे. तर दुसरीकडे बहुतेक कर्मचारी घराबाहेर काम करण्यास प्राधान्य देतात किंवा कामकाजाच्या ठरविक वेळेवर काम करतात असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक निलय वर्मा यांनी व्यक्त केले आहे. नजीकच्याकाळात साथीच्या आजारांपासून बचावासाठी कार्यात्मक रचना समाविष्ट करण्यासाठी कंपन्यांनी धोरणांमध्येही आवश्यक सुधारणा केली पाहिजे असेही ते म्हणाले. त्याचप्रमाणे कॉर्पोरेट संस्थांना माहिती आणि डेटा सुरक्षितता, व्यवसायातील सहकार्याचा प्रभावी वापर आणि बैठक साधनांचा प्रभावी उपयोग करण्यासाठी प्रभावी कर्मचारी गुंतवणूकीचे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.