येवला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी देवदरी येथे पर्यटनासाठी आलेल्या ३३ पर्यटकांवर कारवाई केली. देवदरी येथे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर असून खोलवर दरी, चौफेर हिरवळ, वाहणारा धबधबा पर्यटकाना आकर्षित करतात. लगतच्या तालुक्यातून दरवर्षी या दिवसात हजारोंच्या संख्येने पर्यटक देवदरी येथे येत असतात.
कोरोना मुळे पर्यटनास बंदी असतानाही मोठ्या संख्येने येत असल्याने तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंग राजपूत आणि सहकाऱ्यांनी शनिवारी, अचानक छापा मारून ३३ पर्यटकांवर कारवाई केली. यात सहा जणांवर जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे दाखल झाले असून साडेपाच हजार रुपये दंडही वाहनचालकांकडून वसूल करण्यात आला आहे.कोरोना चे पार्श्वभूमीवर प्रशासनाने देवदरी येथील सिद्धेश्वर देवस्थान व पर्यटन स्थळ १५ सप्टेंबर पर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नियमाचे उल्लंघन केले तर पोलिस कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी दिला आहे.