लंडन – ब्रिटीश रॉयल फॅमिलीमध्ये हाऊस कीपर या पदासाठी भरती केली जात आहे. या पदासाठी तब्बल £१९,१४०.०९ म्हणजेच १८.५ लाख वेतन दिले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १३ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
ब्रिटीश राजघराण्याबद्दल सर्वानाच नेहमीच कुतूहल असते. आता ब्रिटनच्या शाही राजवाड्यात हाऊसकीपिंगची जागा भरायची आहे. सोशल मिडीयावर हा विषय सध्या चर्चेचा बनला आहे. स्वत: राजघराण्याने त्यांच्या अधिकृत वेबसाईटद्वारे याबात माहिती दिली आहे. या जागेसाठी निवड झालेल्या उमेदवाराच्या राहण्याची व्यवस्था रॉयल पॅलेसमध्ये केली जाणार आहे. या सोबतच आजूबाजूच्या परिसरात आणि बकिंगहॅम पॅलेसमध्ये काम करावे लागणार आहे.
उमेदवाराला पॅलेसचा आतील भाग आणि त्यातील वस्तूंची निगा राखण्यासंबंधी प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही जागा कायमस्वरुपात भरण्यात येणार आहे. १३ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नंतर त्याला त्या पदावर कायम करण्यात येणार आहे. उमेदवाराला इंग्लिश आणि गणित या विषयांचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. या आधी हाऊसकीपिंगचा अनुभव आहे त्यांना प्राधान्य देण्यात येईल असेही या जाहीरातीत म्हटले आहे. अर्ज करण्याची २८ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे.