सटाणा – तळवाड़े दिगर येथील प्रगतशील शेतकरी व राजू शेट्टी यांचे जवळचे समर्थक असलेल्या रमेश चिंतामण आहिरे यांची बागलाण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी आहिरे यांना दिले आहे. अहिरे यांच्या निवडीने पश्चिम भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतक-यांच्या प्रश्नांना वाचा फुटण्यास मदत होणार आहे. अहिरे गेली अनेक वर्ष संघटनेच्या माध्यमातून शेतकरी प्रश्नासाठी आक्रमकपणे काम करीत असून संघटनेने त्यांच्या कामाची दखल घेत तालुकाध्यक्षपदी निवड केली आहे. त्यांच्या निवडीचे स्वागत संघटनेचे प्रदेश कार्यकारणी सदस्य गोविंद पगार, राजू शिरसाठ, सुभाष आहिरे, व माजी आमदार संजय चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गणेश आहिरे, पंचायत समितीच्या सभापती इंदुबाई ढुमसे यांनी केले आहे.
मोठी जबाबदारी
गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलने केली आहे. वेळोवेळी संघटनेचा आदेश पाळत शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी प्रयत्न करीत असल्यानेच आज संघटनेने मोठी जबाबदारी दिली आहे.
रमेश आहिरे, बागलाण तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना