मुंबई – आयडिया आणि वोडाफोन यांनी एकत्र येत V! या नव्या नेटवर्कची घोषणा केली. लगेचच सर्व टीव्ही चॅनलवर संबंधित जाहिरात दाखवण्यास सुरुवात झाली. प्रत्येक चॅनलवर बहुतांश वेळा हीच जाहिरात दाखवली जात असल्याने नेटीझन्सने यावर मिम्सचा वर्षाव सुरु केला आहे.
‘सारखी जाहिरात दाखवण्यापेक्षा नवीन टॉवर बांधा किमान सिम रेंज तरी येईल’ असा टोला नेटीझन्सने लगावला आहे. संबंधित जाहिरात बोरिंग आणि कंटाळवाणी असल्याच्या गप्पा सोशल मीडियावर सुरु आहेत. जाहिरात प्रसिद्ध होताच नेटीझन्सने यावर नाराजी व्यक्त व्यक्त केली आहे. काही दिवसांपासून आयडियाच्या नेटवर्क ग्राहकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असता आता नव्याने आलेल्या V! च्या जाहिरातीमुळे ट्रोलिंगला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
नेटिझन्सने पोस्ट केलेल्या मिम्स अशा